शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मेलेनियाने पुन्हा करुन दाखवलं, ट्रम्प यांच्या "हाती" निराशा

By admin | Updated: May 24, 2017 10:03 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा आपल्या पत्नीचा हात हातात घेण्याचा प्रयत्न फसलेला दिसला

ऑनलाइन लोकमत
रोम, दि. 24 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा आपल्या पत्नीचा हात हातात घेण्याचा प्रयत्न फसलेला दिसला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हात पकडण्यासाठी आपला हात पुढे केला असता मेलेनिया ट्रम्प यांनी केसांना हात लावण्याच्या बहाण्याने अत्यंत चतुराईने हात लांब केला. यामुळे पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वांसमोर पंचाईत झाल्याचं दिसत होतं. हा सर्व प्रकार कॅमे-यात कैद झाला असून हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपली पत्नी मेलेनिया ट्रम्पसोबत रोमला पोहोचले असता विमानाच्या दरवाजात उभं राहून उपस्थितांना हात दाखवत होते. यावेळी विमानाच्या पाय-या उतरताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलेनिया ट्रम्पच्या हातात हात देण्याचा प्रयत्न केला. मात्र मेलेनिया ट्रम्प यांनी केस नीट करण्याच्या बहाण्याने अप्रत्यक्षपणे नकारच देऊन टाकला. आपली पंचाईत झाल्याचं लक्षात येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला हात पत्नीच्या पाठीवर ठेवत चालण्यास सुरुवात केली आणि सर्वकाही आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. या दौ-यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पोप फ्रान्सिस यांची भेट घेणार आहेत.
 
याआधीही इस्त्रायल दौ-यावर आगमन झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प रेडकार्पेटवरुन चालत असताना त्यांनी पत्नी मेलेनिया ट्रम्पचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला. पण मेलेनियाने त्यांचा हात चक्क झटकला होता. नेमके हेच दृश्य कॅमे-याने टिपले आणि मग मेलेनियाने डोनाल्ड ट्रम्प यांचा कसा अपमान केला त्याची चर्चा सुरु झाली होती. बेन गुरीऑन विमानतळावर ही घटना घडली. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांची पत्नी साराही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीच्या स्वागतासाठी विमातळावर आले होते.