शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इथिओपियामध्ये भीषण नरसंहार, 320 जणांचा मृत्यू; ओरोमो लिबरेशन आर्मीचा हात असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 18:14 IST

इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांनी, ओरोमियात झालेला हल्ला 'भयानक कृत्य' असल्याचे म्हणत हल्याचा निषेध केला आहे.

इथिओपियाच्या पश्चिम ओरोमिया भागात शस्त्रधाऱ्यांनी 18 जून रोजी हल्ला केला होता. नव्या साक्षिदारांनी म्हटल्यानुसर, या हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला असून, तो तब्बल 320 वर पोहोचला आहे. इथिओपियातील हा सर्वात मोठा नरसंहार असल्याचे बोलले जात आहे. हा हल्ला नोव्हेंबर 2020 मध्ये सुरू झालेल्या टिगरेच्या उत्तरेकडील भागांतील एका संघर्षाशी संबंधित होता का, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे संकेत मिळालेले नाहीत. यामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. घटनेचे  वर्णन करणाऱ्या दोन लोकांनी म्हटल्यानुसार, पीडित अम्हार वंशाचे होते. जे या भागातील अल्पसंख्यक होते.

भयानक कृत्य -इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांनी, ओरोमियात झालेला हल्ला 'भयानक कृत्य' असल्याचे म्हणत हल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले, निर्दोष नागरिकांवरील हल्ले, तसेच अवैध आणि अनियंत्रित शक्तींकडून उपजीविका नष्ट करणे अस्वीकार्य आहे.

ओरोमो वांशाचे लोक राजकीयदृष्ट्या उपेक्षित?इथिओपियातील ओरोमियामधील सर्वात मोठा समुदाय ओरोमो सोबतच इतर जातीचे काही समूह राजकीय दृष्ट्या उपेक्षित आहेत. तसेच त्यांचे केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपेक्षेमुळे मोठे नुकसान झाले आहे. अबी हे ओरोमो आणि इथिओपियाचे पहिलेच पंतप्रधान आहेत. मात्र, काही ओरोमोसनी म्हटले आहे, की त्यांनी समाजाच्या हितांकडे दूर्लक्ष केले आहे.

ओरोमो लिबरेशन आर्मी दोषी?ही घटना ओरोमियाच्या पश्चिमेकडील व्होलेगाच्या गिंबी भागात घडली. एकाने म्हटल्यानुसार, 260 लोक मारले गेले होते. तर दुसऱ्याने म्हटले आहे, की 320 लोक होते. येथील नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव आपले नाव सांगण्यास नकार दिला आहे. ओरोमिया भागातील सरकारने एका निवेदनात ओरोमो लिबरेशन आर्मीला दोषी ठरवले आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय