शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मरियम नवाज यांच्याकडून इम्रान खान यांच्या धमकीच्या पत्राची पोलखोल, केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 12:24 IST

Maryam Nawaz : पंतप्रधान इम्रान खान कथित धमकीचे पत्र का दाखवत नाहीत? असा सवाल मरियम नवाज यांनी केला आहे.

इस्लामाबाद : इम्रान खान (Imran Khan) यांच्या धमकीच्या पत्राबाबत (Threat Letter) पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज (Maryam Nawaz) यांनी मोठा दावा केला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ज्या पत्राच्या मदतीने परदेशी षड्यंत्राचा आरोप केला होता, ते पत्र परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी तयार केले होते. म्हणजेच इम्रान खान यांनी स्वतःच त्यांच्या कर्मचार्‍यांकडून पत्र लिहून घेतले, जेणेकरून 'षड्यंत्र' सांगून जनतेची दिशाभूल केली जाऊ शकेल, असे  मरियम नवाज यांनी म्हटले आहे. 

पत्र दाखवत का नाहीत इम्रान खान?वेबसाइट WION मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान इम्रान खान कथित धमकीचे पत्र का दाखवत नाहीत? असा सवाल मरियम नवाज यांनी केला आहे. तसेच, इम्रान खान यांना धमकीचे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे मरियम नवाज यांनी सांगितले. इम्रान खान यांनी स्वत: एक पत्र तयार करून घेतले आणि परकीय कारस्थानाचा आरोप करून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

ब्रुसेल्सला राजदूत पाठवण्याबाबत सवालइम्रान खान यांचा खरपूस समाचार घेत मरियम नवाज म्हणाल्या की, इम्रान खान यांच्याकडून सांगण्यात आले होते की अमेरिकेत तैनात पाकिस्तानी राजदूताला हे धमकीचे पत्र मिळाले होते, मग त्यांना ब्रसेल्सला का पाठवले? राजदूताला सर्वोच्च न्यायालयात हजर करावे, अशी आमची मागणी आहे. मरियम नवाज यांनी      लाहोर येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, इम्रान खान यांनी पत्र लिहिण्याच्या एक दिवस आधी, अमेरिकेतील पाकिस्तानच्या राजदूताला अचानक ब्रसेल्सला पाठवण्यात आले होते. असे का केले?  याचे उत्तर इम्रान खान यांना द्यावे लागेल.

'इम्रान खान यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला जाईल'पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकीय फायद्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (एनएससी) व्यासपीठाचा गैरवापर केल्याचा दावा मरियम नवाज यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की. एनएससीच्या अधिकृत निवेदनात परकीय षड्यंत्राचा उल्लेख नाही. हे पत्र परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनीच लिहिले आहे. मरियम नवाज पुढे म्हणाल्या की, इम्रान खान देशद्रोही आहेत आणि त्याच्यावर भविष्यात देशद्रोहाचा खटला चालवला जाईल.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय