शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

ओबामांची कन्या माल्यासाठी विवाहाचा प्रस्ताव

By admin | Updated: June 1, 2015 02:10 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मोठी मुलगी माल्या (१६) हिच्यावर केनियातील एका वकिलाचे प्रेम बसले असून, त्याने विवाहाचा प्रस्ताव मांडला आहे

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मोठी मुलगी माल्या (१६) हिच्यावर केनियातील एका वकिलाचे प्रेम बसले असून, त्याने विवाहाचा प्रस्ताव मांडला आहे. विवाहात मुलाकडून हुंडा म्हणून ९० हजार डॉलर किमतीचे १५० प्राणी देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्राण्यात ७० गाई, ५० बकऱ्या व ३० मेंढ्या यांचा समावेश आहे. फेलिक्स कि प्रोनो असे या २४ वर्षाच्या वकीलाचे नाव असून , तो म्हणतो, लोकांना वाटेल की ओबामा कुटुंबाच्या संपत्तीकडे पाहून मी माल्याला विवाहाचा प्रस्ताव देतो आहे, पण तसे काही नाही, माझे प्रेम खरे आहे, माल्याशी विवाह करणे हे माझे जुनेच स्वप्न आहे. फेलिक्स सध्या ब्रिटनमधील आॅक्सफर्ड विद्यापीठात कायदा क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ओबामा कुटुंब मूळचे केनियाचे असल्याचे सांगत किप्रोनो म्हणतो केनियन रक्त पुन्हा आपल्या भूमीकडे यावे अशी माझी इच्छा आहे. २००८ साली मला माल्याविषयी कळले , तेव्हापासून मी तिच्या प्रेमात आहे, एवढेच नाही तर तिच्याशी एकनिष्ठ राहायचे म्हणून मी दुसऱ्या कोणाला डेटिंगलाही बोलावले नाही. माझी ही आवड मी घरातल्या लोकांना सांगितली आहे, त्यानाही माल्या पसंत असून, त्यानी हुंड्याची रक्कम वाढविण्याचीही तयारी दर्शविली आहे. ओबामा जुलै महिन्यात केनियाला येणार आहेत, त्यावेळी त्याना भेटून हा प्रस्ताव देण्याचा फेलिक्सचा विचार आहे. सध्या तो ओबामा यांना पत्र लिहीत असून केनिया भेटीत त्यानी माल्याला बरोबर आणावे अशी विनंती करणार आहे. हे पत्र तो नैरोबी येथील अमेरिकन दूतावासाला देणार आहे. किप्रोनो याने आपल्या वंशाची घर घराण्याची माहितीही दिली असून,आपले कुटुंब अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कुटुंबाच्या बरोबरीचे आहे असा त्याचा दावा आहे. केनियातील कालेंजिन समाजाचा हा युवक आहे.