शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी चीनसह अनेक राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण, PM मोदींना नाही; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:18 IST

डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी दुसऱ्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प येत्या 20 जानेवारीला अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे नेतृत्व करणार आहेत. वॉशिंग्टन डीसी येथे हा शपथविधी सोहळा होणार असून, त्यात जागतिक नेतेही सहभागी होणार आहेत. चीन, अर्जेंटिना, इटली, अल साल्वाडोर आणि हंगेरीसह अनेक देशांच्या नेत्यांना निमंत्रण पाठवल्याची माहिती आहे. मात्र, या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

नरेंद्र मोदींना निमंत्रण नाही?गेल्यावर्षी झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांचा पराभव करत दुसऱ्यांदा अमेरिकेची सत्ता काबीज केली. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मोदींसोबतची भेट आपली निवडणूक प्रतिमा मजबूत करेल, असा ट्रम्प यांचा विश्वास होता.

अर्जेंटिनाचे अध्यक्ष झेवियर मिले, हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन आणि इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यासारखे जागतिक नेते ट्रम्प यांना पाठिंबा देत होते किंवा त्यांची भेट घेत होते. मोदींसोबतच्या भेटीमुळे ट्रम्प समर्थक आणि सर्वसामान्य अमेरिकन जनतेला मोठा संदेश गेला असता. पण, ट्रम्प यांनी मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यावर भारतासमोर मोठा पेच निर्माण झाला होता.

भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम2019 मध्ये झालेला 'हाऊडी मोदी' कार्यक्रम मोठी राजकीय चूक मानली गेली. शिवाय, मोदींनी ट्रम्प यांची भेट घेतली असती आणि कमला हॅरिस निवडणूक जिंकल्या असत्या, तर त्याचा भारत-अमेरिका संबंधांवर नकारात्मक परिणाम झाला असता, त्यामुळेच मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली नाही.

ट्रम्प यांची नाराजी मोदींनी भेट नाकारल्यामुळे ट्रम्प नाराज झाल्याचीही चर्चा त्यावेळी होती. आता ट्रम्प यांनी निवडणूक जिंकली असून, ते 20 जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांनी शपथविधीसाठी वैचारिकदृष्ट्या जवळचे किंवा निवडणुकीत उघडपणे पाठिंबा देणाऱ्या बहुतांश नेत्यांना निमंत्रण पाठवले आहे. 

भारताची संतुलित भूमिकादरम्यान, भारत सरकारच्या उच्च सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला भारतातून कोणीही जाणार नाही. डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन, या दोन्ही पक्षांशी समान संबंध राखणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. भारताने नेहमीच हे अमेरिकेसोबतचे संबंध कोणत्याही एका राजकीय पक्षापुरते मर्यादित ठेवले नाहीत. ट्रम्प आणि मोदी यांच्यातील संबंध चांगले असतील, पण भारताने राजनैतिक संतुलन राखण्याचा निर्णय घेतला.

पुढे काय होणार?पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहिल्याने त्याचा दीर्घकालीन परिणाम होणार नाही. ट्रम्प असो वा अन्य कोणी, भारत-अमेरिका संबंध मजबूत राहतील. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका