शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मँचेस्टर हल्ला : एकटाच होता हल्लेखोर, स्फोटासाठी आयइडीचा केला वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 18:50 IST

अमेरिकन पॉप गायिका आरियाना ग्रँड हिच्या संगीत कार्यक्रमादरम्यान झालेल्या हल्ल्यामागे आत्मघाती हल्लेखोराचा हात असल्याचे समोर

ऑनलाइन लोकमत
मँचेस्टर, दि. 23 -  अमेरिकन पॉप गायिका आरियाना ग्रँड हिच्या संगीत कार्यक्रमादरम्यान झालेल्या हल्ल्यामागे आत्मघाती हल्लेखोराचा हात असल्याचे समोर आले आहे. या हल्लेखोराने स्फोट घडवण्यासाठी आयइडी स्फोटकांचा वापर केल्याची माहिती ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या स्फोटात हा हल्लेखोरही ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 
सोमवारी रात्री इंग्लंडच्या मँचेस्टर शहरात झालेल्या अरियाना ग्रँडच्या पॉप कॉन्सर्टमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला होता. तर  59 जण जखमी झाले. या  स्फोटात मुत्युमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
हल्ल्याबाबत माहिती देताना ग्रेटर मँचेस्टर पोलीस दलाचे प्रमुख इयान हापकिन्स यांनी या हल्ल्यामागे आत्मघाती हल्लेखोराचा हात असल्याच्या माहितीस दुजोरा दिला आहे. मात्र हा या हल्लेखोराने एकट्यानेच हा हल्ला घडवून आणला की त्याचामागे कुठल्या प्रबळ दहशतवादी संघटनेचा हात आहे, याबाबत पोलिसांना अद्याप विश्वसनीय माहिती मिळालेली नाही. हाफकिन्स म्हणाले, "मँचेस्टर येथील कार्यक्रमात स्फोट घडवणारा हल्लेखोर एकटाच होता. त्याच्याजवळ आयइडी स्फोटके होती. कार्यक्रम संपल्यावर त्याने त्यांचा स्फोट घडवून आणला.   या स्पोटादरम्यान तोसुद्धा  ठार झाला. "
 
ग्रेटर मँचेस्टरमध्ये झालेला आतापर्यंतचा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला आहे. यापुढे अशाप्रकारचा प्रसंग येणार नाही अशी अपेक्षा करूया.  आरियाना ग्रँड हिच्या संगीत कार्यक्रमासाठी अनेक कुटुंबे, विशेष करून तरुण वर्ग आला होता. या हल्ल्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला. 
 
दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ब्रिटीश सरकारने आपातकालीन बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती डाऊनिंग स्ट्रीटने प्रसिद्ध केली आहे. काल रात्री झालेला हल्ला हा 7 जुलै 2005 रोजी लंडनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतरचा सर्वात मोठा हल्ला आहे.