शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

मानवनिर्मित वस्तूंचे वजन उच्चांकावर; संशोधकांचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 2:22 AM

सिमेंट, काँक्रिट, प्लास्टिक, धातू, अस्फाल्ट अशा विविध वस्तूंची पृथ्वीवर एवढ्या भरमसाठ प्रमाणात निर्मिती झाली आहे की, यंदाच्या वर्षअखेरीस सर्वाधिक वजन या वस्तूंचेच असेल, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

लंडन : या भूतलावर सर्वाधिक वजनदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला, तर त्याचे उत्तर हत्ती, जिराफ, देवमासा किंवा तत्सम प्राणी असे न देता, सरळसरळ ‘मानवनिर्मित वस्तू’ असे देता येऊ शकणार आहे. तब्बल १.१ टेराटन एवढे वजन या मानवनिर्मित वस्तूंचे आहे!सिमेंट, काँक्रिट, प्लास्टिक, धातू, अस्फाल्ट अशा विविध वस्तूंची पृथ्वीवर एवढ्या भरमसाठ प्रमाणात निर्मिती झाली आहे की, यंदाच्या वर्षअखेरीस सर्वाधिक वजन या वस्तूंचेच असेल, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. इस्रायलमधील वाइझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतील रॉन मिलो आणि त्यांचे सहकारी हे सर्वजण भूतलावरील जैविक वस्तू आणि मानवनिर्मित वस्तू यांची मोजणी करत आहेत. त्यांनी फक्त जमिनीवरील वस्तूंचे वजन मोजले आहे. पाण्यावरील वा पाण्याखालील वस्तूंचे वजन या पथकाने गृहीत धरलेले नाही. साधारणत: १९०० सालापासूनचा डेटा या पथकाने संकलित केला आहे. त्यावरून काढलेल्या निष्कर्षानुसार यंदाच्या वर्षअखेरपर्यंत वर उल्लेखलेल्या मानवनिर्मित वस्तूंचे वजन जैविक कचऱ्याच्या तुलनेत अधिक भरेल, असे आढळून आले.आकडेवारी काय सांगते...२० व्या शतकाच्या सुरुवातीला मानवनिर्मित वस्तूंचे वजन जागतिक जैविक कचऱ्याच्या तुलनेत ३ टक्के होते; परंतु २०२० मध्ये मानवनिर्मित वस्तूंचे वजन जागतिक जैविक कचऱ्याच्या तुलनेत १.१ टेराटनने अधिक भरल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले.