शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विमानात हरवलं वॉलेट, सरप्राइज गिफ्टबरोबर मिळालं परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 19:50 IST

अशीच घटना अमेरिकेतल्या हंटर शमेटबरोबरच घडली आहे.

वॉशिंग्टन- डिजिटल माध्यमाच्या युगात पेनानं पेपरवर लिहून पत्र पाठवण्याची पद्धत काहीशी कालबाह्य झाली आहे. त्यामुळे असं एखादं पत्र आपल्याला मिळाल्यास त्याचं फारच अप्रूप वाटतं. हातानं लिहिलेल्या पत्रातून आपल्याला आपुलकीची जाणीव होते. अशीच घटना अमेरिकेतल्या हंटर शमेटबरोबरच घडली आहे. खरं तर हंटर यांचं वॉलेट विमानात हरवलं होतं. त्यांना ते एका सरप्राइज गिफ्टबरोबर परत मिळालं आहे.हंटर काही दिवसांपूर्वी बहिणीच्या लग्नाकरिता लास वेगासला गेले होते. त्याच वेळी प्रवासात त्यांचं वॉलेट हरवल्याचं त्यांना समजलं. हंटर यांच्या आई जिनी शमेट यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट टाकली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, हंटरच्या हरवलेल्या वॉलेटमध्ये 60 डॉलर कॅश, 400 डॉलरचा एक पे-चेक, डेबिट कार्ड आणि आयडी कार्ड होतं. बहिणीचं लग्न असल्यानं त्यानं याबाबत जास्त विचार केला नाही आणि पालकांकडून पैसे उधारीवर घेतले आहेत.वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, हंटर हे वॉलेट हरवल्यानं फारच अडचणीच सापडले होते. त्यांना वाटलं त्यांचं वॉलेट कदाचित विमानात पडलं असावं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी याची माहिती फ्रँटियर विमान प्रशासनाला दिली. परंतु विमान कंपनीनं अशा कोणत्याही प्रकारचं वॉलेट मिळालं नाही, असं सांगितलं. बहिणीचं लग्न उरकून जेव्हा हंटर पुन्हा लास वेगासवरून स्वतःच्या घरी ओमाहा जात होते. त्यावेळी आयडी नसल्यानं त्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं. एका तास तपासणी आणि चौकशी केल्यानंतर त्यांना विमानानं प्रवास करण्याची परवानगी मिळाली.हंटर सांगतात, जेव्हा ते ओमाहाला पोहोचले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना एक पार्सल मिळालं. या पार्सलमध्ये हंटरचं वॉलेटमध्ये असलेल्या सर्वसामानासह ठेवण्यात आलं होतं. त्याबरोबरच एक चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं की, मला तुमचं हे वॉलेट ओमाहाहून लास वेगासला जाणाऱ्या फ्रंटियर फ्लाइटच्या 12व्या लाइनच्या सीट एफ आणि दिवाळाच्या मध्ये मिळालं. मला वाटलं तुम्हाला याची गरज असेल, ऑल द बेस्ट. मी तुमच्या 60 डॉलर कॅशचे 100 डॉलर केले आहेत. जेणेकरून जेव्हा तुम्हाला वॉलेट मिळेल, तेव्हा तुम्ही आनंदानं पार्टी करू शकाल. वॉलेट पुन्हा मिळाल्यानं हंटरच्या कुटुंबीयांनीही त्या अज्ञात व्यक्तीचे फेसबुकवरून आभार मानले आहेत. हंटरच्या आईनं पुन्हा दुसरी फेसबुक पोस्ट लिहिलं आहे. जर आम्ही त्या व्यक्तीला शोधू शकलो, तर त्यांचे व्यक्तिगत स्वरूपात आभार मानू, त्यामुळे त्या व्यक्तीला शोधण्यासाठी मदत करण्याचं आवाहनही आईनं केलं आहे.