शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

"पुरुष अधिकाऱ्यानं केली शारीरिक तपासणी, ८ तास टॉयलेटलाही जायला दिलं नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:08 IST

हे सर्व माझ्यासोबत झालं कारण माझ्या हँडबॅगमध्ये एक पॉवर बँक होते. ज्याला तिथल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी संशयास्पद मानलं होते असं श्रुती चतुर्वेदी यांनी म्हटलं.

अमेरिकन विमानतळावर एका भारतीय महिला उद्योगपतीला दिलेल्या वागणुकीमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेच्या एअरपोर्टवर FBI अधिकाऱ्यांनी ८ तास ताब्यात ठेवल्याने महिलेची फ्लाईट चुकली. याबाबत महिलेने सोशल मीडियावर पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत. एका पुरुष अधिकाऱ्याने कॅमेऱ्याच्या देखरेखीत माझी शारीरिक तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार महिलेने सांगितला.

श्रुति चतुर्वेदी असं या भारतीय महिला उद्योगपतीचं नाव आहे. श्रुती यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या की, एका पुरुष अधिकाऱ्याने माझी शारीरिक तपासणी केली. मला ८ तास एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात ठेवले. हे सर्व यासाठी झाले कारण माझ्या हँडबॅगमध्ये पॉवर बँक होती. अलास्काच्या एंकोरेज एअरपोर्टवरील सुरक्षा रक्षकांना हे संशयित वाटले. त्यामुळे मला ८ तास ताब्यात ठेवले. या  काळात मला टॉयलेटलाही जाण्याची परवानगी दिली नाही असं त्यांनी सांगितले.

समजा, तुम्हाला कुणी विना काही कारण ८ तास बसवून ठेवले जाईल. काहीही प्रश्न विचारले जातील. कॅमेऱ्यासमोर पुरुष अधिकारी तुमची शारीरिक चाचणी घेईल. तुमचे उष्णतेचे कपडे, मोबाईल, पर्स सर्व काही हिसकावून घेतले जाईल. थंड खोलीत ठेवले जाईल. टॉयलेटलाही जाऊ दिले नाही. ना तुम्ही कुणाला कॉल करू शकता, तुमची फ्लाईटही चुकेल. हे सर्व माझ्यासोबत झालं कारण माझ्या हँडबॅगमध्ये एक पॉवर बँक होते. ज्याला तिथल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी संशयास्पद मानलं होते असं श्रुती चतुर्वेदी यांनी म्हटलं.

दरम्यान, श्रुती चतुर्वेदी यांनी त्यांची ही पोस्ट भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र विभागाला टॅग केले आहे. मला अजून कल्पना करण्याची गरज नाही कारण मी आधीच माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट ७ तास घालवलेत. हे का झाले सर्वांना माहिती आहे असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं. याआधी श्रुती यांनी अलास्का दौऱ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र हा अनुभव त्यांच्या कायम कटू आठवणीत राहिला आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतAirportविमानतळ