शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मालदीवच्या मंत्र्याची PM मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी; वाद वाढल्यानंतर मालदीव सरकारने झापलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 15:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या महिला मंत्र्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली.

Maldives vs India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लक्षद्वीपचा दौरा केला. यानंतर सोशल मीडियावर मालदीवमधून भारताविरोधात वक्तव्ये येत आहेत. दरम्यान, मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनीदेखील X वर एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्द वापरले. काही वेळानंतर पोस्ट डिलीट केली. आता हाच मुद्दा भारताने मालदीव सरकारसमोर उपस्थित केला आहे. 

मालदीवच्या महिला मंत्र्याने पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. उच्चायुक्तांनी हा मुद्दा मोहम्मद मुइज्जू सरकारसमोर उपस्थित केला असून, मालदीव सरकारनेदेखील आपल्या मंत्र्याच्या टिप्पणीवर एक निवेदन जारी केले आहे. 'हे त्या मंत्र्याचे वैयक्तिक मत आहे. मालदीव सरकारचा त्या मताशी काही संबंध नाही,' असे निवेदनात म्हटले आहे.

मालदीव सरकारचे निवेदन 

या प्रकरणाबाबत एक निवेदन जारी करताना मालदीव सरकारने की, 'मालदीव सरकारला सोशल मीडियावरील या अपमानास्पद टिप्पण्यांची जाणीव आहे. ही मते त्यांची वैयक्तिक आहेत असून, मालदीव सरकार त्याचे समर्थन करत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर जबाबदारीने केला पाहिजे. मालदीव आणि इतर देशातील संबंधांना बाधा येणार नाही, अशा पद्धतीने मत व्यक्त केले पाहिजे. अशी अवमानकारक टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई करण्यास शासनाचे संबंधित अधिकारी मागेपुढे पाहणार नाहीत,' असे या निवेदनात म्हटले आहे.

मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी केली टीका

मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर टीका करणाऱ्या मंत्र्याचा निषेध केला. यासोबतच त्यांनी आपल्याच देशातील नेत्यांनाही सल्ला दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंत्री मरियम शिउना यांनी वापरलेली भाषा 'अभद्र' असल्याची टीका नशीद यांनी केली. तसेच, मालदीवच्या सुरक्षेसाठी आणि समृद्धीसाठी भारत हा 'मुख्य सहयोगी' असल्याचे ते म्हणाले. 

नेमका काय वाद आहे?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली होती आणि भारतीयांना या बेटाला भेट देण्याचे आवाहन केले होते. यानंतर मालदीवच्या युवा सक्षमीकरण उपमंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. भारतीय नेटीझन्सकडून टीका झाल्यानंतर मरियम शिउना यांनी पोस्ट हटवली. भारतात सोशल मीडियावर ‘#BoycottMaldives’ ट्रेंड होत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaldivesमालदीवlakshadweep-pcलक्षद्वीपCentral Governmentकेंद्र सरकार