शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारशी अकारण 'पंगा' घेणारे मलेशियाचे PM महातीर मोहम्मद यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 16:37 IST

मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

ठळक मुद्देमलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.महातीर यांचा पक्ष बेरास्तूनं सरकारशी असलेली आघाडी तोडली आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. 94 वर्षांचे जगातील सर्वात वयोवृद्ध नेते असलेल्या महातीर यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.

क्वालालंपूरः काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा मुद्दा आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी भारताविरोधात कायम भूमिका घेतली होती. त्यानंतर भारतानंही मलेशियाकडून पाम ऑइल खरेदी करण्यावर बंदी घातली होती. आता मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. टीव्ही चॅनेल अल जजिराच्या माहितीनुसार, महातीर यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा तिथल्या राजांकडे सुपूर्द केला आहे. महातीर मोहम्मद 10 मे 2018ला पंतप्रधान झाले होते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, महातीर यांचा पक्ष बेरास्तूनं सरकारशी असलेली आघाडी तोडली आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. 94 वर्षांचे जगातील सर्वात वयोवृद्ध नेते असलेल्या महातीर यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. महातीर यांनी मलेशियाचे पंतप्रधान म्हणून राजीनामा दिला आहे.  का दिला राजीनामा?गेल्या काही आठवड्यांपासून मलेशियाच्या राजकारणात अस्थिरता आली होती. खरं तर 2018मध्ये महातीर आणि अन्वर इब्राहिमनं मिळून सरकार स्थापन केलं होतं. 94 वर्षांचे महातीर कालांतरानं सत्ता अन्वर यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचीही मल्लिनाथी करण्यात आली होती. परंतु अन्वर यांनी महातीर यांच्या पक्षावर फसवणुकीचा आरोप लावला आहे. महातीर यांनी आम्हाला धोका देत युनायटेड मलायस नॅशनल ऑर्गनायझेशन (UMNO)बरोबर हातमिळवणी केली आहे. राजकारणातले चाणाक्ष्य खेळाडू आहेत महातीरमहातीर यांची मलेशियाच्या राजकारणावर मजबूत पकड होती. वर्षं 1981 पासून 2003पर्यंत पंतप्रधान राहिले होते. त्यानंतर 2018मध्ये पुन्हा एकदा त्यांनी सत्ता सांभाळली होती. 2018मध्ये त्यांनी नझीब रझाक यांचा पराभव केला होता. रझाक यांच्यावर त्यावेळी भ्रष्टाचाराचे आरोप होते. इम्रान खान यांचे मित्रपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि महातीर यांच्यामध्ये मैत्री वृद्धिंगत झाली होती. त्यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या बाजूनं मतप्रदर्शन केलं होतं. त्यानंतर  भारत आणि मलेशियाच्या मैत्री अंतर पडलं होतं. त्याचबरोबर भारतानं मलेशियाकडून पाम ऑइल आयातीवर बंदी घातली होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMalaysiaमलेशिया