शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मलेशिया; नजीब रजाक यांच्या घरात सापडल्या पैसे, दागिने भरलेल्या बॅगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 13:22 IST

नजीब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, त्यामुळे लोकांनी त्यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये नाकारले.

क्वालालंपूर- मलेशियाचे माजी पंतप्रधान आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर निवडणुकीत पराभूत झालेल्या नजीब रजाक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. महाथिर मोहंमद यांच्या नेतृत्त्वाखाली नवे सरकार मलेशियामध्ये अस्तित्त्वात आल्यावर नजीब आणि त्यांची पत्नी यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या दोन निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये पैसे आणि दागिने भरलेल्या हँडबॅग्ज सापडल्या असून शेकडो महागड्या पर्स जप्त करण्यात आल्या आहेत.

नजीब यांच्या घरामध्ये महागड्या वस्तूंनी भरलेले 284 खोके पोलिसांनी जप्त केले आहेत.  विविध नोटांनी भरलेल्या आणि दागिने, महागडी घड्य़ाळे असलेल्या 72 बॅगांचाही या जप्त केलेल्या वस्तूंमध्ये समावेश आहे. या सर्व वस्तूंची किंमत किती होते याची मोजणी करण्यात येत आहे. नजीब यांच्यावर 4.5 अब्ज डॉलर्सचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.मलेशियामध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रजाक यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. त्याबद्दल बोलताना रजाक म्हणाले होते, ' जे झालं ते अत्यंत दुःखदायक आहे मात्र लोकशाहीच्या तत्वांना अनुसरुन एक पक्ष म्हणून हा निकाल स्वीकारावा लागेल'. नजीब आणि त्यांची पत्नी रोस्माह मॅन्सोर यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

नजीब यांचा पराभव 92 वर्षांचे मलेशियन नेते महाथिर मोहंमद यांनी केला. ते लोकशाही पद्धतीने निवडून येणारे जगातील सर्वात वयोवृद्ध नेते आहेत. नजीब यांनी मलेशियात 1 मलेशिया डेव्हलपमेंट बर्हार्ड (1एमडीबी ) योजनेत कोट्यवधी डॉलर्सचा भ्रष्टाचार केला असे सांगण्यात येते. महाथिर याबाबत बोलताना म्हणाले होते, ''आम्ही नजीब यांचा राजकीय सूड वगैरे घेण्याच्या विचारात नाही तर आम्ही कायद्याचे राज्य स्थापन करणार आहोत, जर नजीब यांनी काहीतरी चुकीचं केल्याचं कायद्याद्वारे सिद्ध झालं तर त्यांना परिणाम भोगावेच लागतील.''  नजीब आणि त्यांच्या पत्नीवर देश सोडण्याची मनाई केल्यानंतर नजीब यांनी ट्वीट करुन आपण सरकारच्या निर्णयाचा आदर करतो असे म्हटले आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयMalaysiaमलेशिया