शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या अण्वस्त्र शस्त्रागारावर मोठा सायबर हल्ला, गोपनीय माहितीची हॅकर्सकडून चोरी

By बाळकृष्ण परब | Updated: December 18, 2020 08:58 IST

cyber attack on US nuclear agency : जगातील सर्वात मोठा अण्वस्त्रसंपन्न देश म्हणून अमेरिकेची ओळख आहे. अमेरिकेकडे हजारो अण्वस्त्रे असून, त्यांची सुरक्षादेखील तितकीच कडेकोट आहे. मात्र... v

ठळक मुद्देअमेरिकेच्या या अवस्त्रसाठ्याची देखरेख करणाऱ्या राष्ट्रीय अण्वस्त्र संरक्षण प्रशासन (एनएनएसए) आणि ऊर्जा विभाग (डीओई) च्या नेटवर्कची सुरक्षा भेदत हॅकर्सनी त्यावर केला मोठा सायबर हल्लाया हॅकर्सनी मोठ्या प्रमाणावर गोपनीय दस्तऐवजांची चोरी केल्याचा दावा या सायबर हल्ल्याचा फटका अनेक केंद्रीय एजन्सींना बसला आहे

वॉशिंग्टन - जगातील सर्वात मोठा अण्वस्त्रसंपन्न देश म्हणून अमेरिकेची ओळख आहे. अमेरिकेकडे हजारो अण्वस्त्रे असून, त्यांची सुरक्षादेखील तितकीच कडेकोट आहे. मात्र अमेरिकेच्या या अवस्त्रसाठ्याची देखरेख करणाऱ्या राष्ट्रीय अण्वस्त्र संरक्षण प्रशासन (एनएनएसए) आणि ऊर्जा विभाग (डीओई) च्या नेटवर्कची सुरक्षा भेदत हॅकर्सनी त्यावर मोठा सायबर हल्ला केला आहे. या हॅकर्सनी मोठ्या प्रमाणावर गोपनीय दस्तऐवजांची चोरी केल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच या सायबर हल्ल्याचा फटका अनेक केंद्रीय एजन्सींना बसला आहे.अमेरिकी मीडिया पॉलिटिकोने दिलेल्या वृत्तानुसार ऊर्जा विभागाचे मुख्य माहिती अधिकारी रॉकी कँपियोन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यानंतर राष्ट्रीय अण्वस्त्र संरक्षण प्रशासन आणि ऊर्जा विभागाच्या टीमने हॅकिंगबाबची सर्व माहिती यूएस काँग्रेस समितीला पाठवली आहे. लवकरच सरकारकडून याबाबत सविस्तर माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.ज्या संस्थांमध्ये संरक्षण अधिकाऱ्यांनी संशयास्पद हालचाली रेकॉर्ड केल्या आहेत. त्यामध्ये न्यू मेक्सिको आणि वॉशिंग्टनची फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमिशन (एफईआरसी), सँडिया राष्ट्रीय प्रयोगशाळा न्यू मेक्सिको आणि लॉस अलामोस राष्ट्रीय प्रयोगशाळा, वॉशिंग्टन, राष्ट्रीय अण्वस्त्र संरक्षण प्रशासनाचे सुरक्षित परिवहन कार्यालय आणि रिचलँड फिल्ड कार्यालय यांचा समावेश आहे. हे सर्व विभाग अमेरिकेच्या अण्वस्त्र हत्यारांचे साठे निंयंत्रित करतात आणि सुरक्षित वाहतुकीची निश्चिती करतात.दरम्यान, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे हॅकर्स अन्य एजन्सींपेक्षा फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमिशनला अधिक नुकसान पोहोचवू शकतात. या एजन्सीच्या नेटवर्कमध्ये घुसखोरीचे सर्वाधिक पुरावे सापडले आहेत. याबाबत सायबर सिक्यॉरिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर सिक्योरिटी एजन्सी हॅकिंगबाबतच्या हालचालींचा तपास करण्यामध्ये अमेरिकेच्या फेडरल सर्व्हिसेसना मदत करत आहेत.अमेरिकेची सायबर सुरक्षा ट्रम्प यांच्या कार्यकाळात कमकुवत झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, या सायबर हल्ल्यात किती डेटा चोरी झाला याची माहिती अधिकाऱ्यांना मिळू शकलेली नाही. पुढच्या काही दिवसांत नेटवर्कमधून किती माहितीची चोरी झाली याचा शोध लावला जाईल, असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :United Statesअमेरिकाcyber crimeसायबर क्राइमInternationalआंतरराष्ट्रीय