शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नशीब असावं तर असं! ट्रकमधील डिझेल संपत आलं अन् महिलेला मालामाल झाली, मिळाले 8 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 16:00 IST

तब्बल 8 कोटी जिंकणाऱ्या महिलेने ट्रकमधील डिझेल कमी झाल्यानेच आपल्याला लॉटरी लागल्याचं सांगितलं आहे. 

आपण रातोरात श्रीमंत व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. एकदा तरी लॉटरी लागावी अशी सर्वांचीच इच्छा असते. पण तुम्हाला जर कोणी  ट्रकमधील डिझेल कमी होणं आणि लॉटरी लागण्याचा काही संबंध आहे असं सांगितलं. तर तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. अशीच एक हटके घटना घडली आहे. तब्बल 8 कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या महिलेने हा संबंध जोडला असून ट्रकमधील डिझेल कमी झाल्यानेच आपल्याला लॉटरी लागल्याचं सांगितलं आहे. 

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहणाऱ्या लॉरा किन या ख्रिसमससाठी प्रियकरासोबत ट्रकने शॉपिंगला गेल्या होत्या. यावेळी ट्रकमधील इंधन संपत असल्याची सूचना देणारी लाईट पेटू लागली. यानंतर लॉरा यांनी नॉर्थ कॅरोलियामधील सेव्हन इलेव्हन पेट्रोल पंपावर ट्रक थांबवला. त्यांनी ट्रकमध्ये डिझेल भरलं. पंपावर डिझेल भरत असताना लॉरा यांनी तिथे लॉटरीचं तिकीट काढलं. यानंतर अवघ्या काही मिनिटांत लॉरा यांना लॉटरी लागली. 

लॉरा यांनी तब्बल आठ कोटीपेक्षा अधिक रक्कम जिंकली आहे. लॉटरी लागल्याचं समजताच लॉरा यांना प्रचंड आनंद झाला. आपल्याला लॉटरी लागली आहे, यावर त्यांना बराच वेळ विश्वासच बसला नाही. त्या आनंदाच्या भरात मोठमोठ्याने ओरडू लागल्या. ज्या परिस्थितीत लॉटरी लागली त्याबद्दल लॉरा यांना सर्वाधिक आश्चर्य वाटलं. 

ट्रकमधील इंधन त्या दिवशी संपल्याचा सिग्नल पेटलाच नसता तर मी लॉटरीचं तिकिट खरेदीच केलं नसतं. त्यामुळे जुळून आलेल्या योगायोगानं चकित झाल्याचं लॉरा यांनी सांगितलं. नॉर्थ कॅरोलिनामध्ये वास्तव्यास असलेल्या मार्सिया फिने यांनीदेखील काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे लॉटरी जिंकली होती. मार्सिया एका दुकानात चिप्स खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्यांनी दुकानातून 2 हजार रुपयांचं लॉटरीचं तिकिट खरेदी केलं. त्यामुळे त्यांना 57 लाख रुपयांची लॉटरी लागली.

पत्नी ठरली लकी, टॅक्सी ड्रायव्हर झाला करोडपती; मिळाले 2 कोटी 80 लाख

टॅक्सी ड्रायव्हरचं नशीब रातोरात बदलल्याची घटना समोर आली आहे. एका झटक्यात तो करोडपती झाला आहे. लॉटरी लागली असून त्याने तब्बल 2 कोटी 80 लाख रुपये जिंकले आहेत. टॅक्सी ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार, तो कोट्यधीश झाला मात्र त्यामागे त्याच्या दिवंगत पत्नीचा मोठा वाटा आहे. त्याने पत्नीच्या वयाच्या नंबरचा उपयोग करून लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. टॅक्सी ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. लॉटरी घेताना त्याने पत्नीच्या वयाच्या नंबरचा वापर करून लॉटरीची दोन तिकीटं खरेदी केली. दोन्ही तिकीट एकाच नंबरचे होते. नशिबाने त्याला लॉटरी लागली आणि त्याने तब्बल 12 मिलियन Bath म्हणजेच दोन कोटी 80 लाख रुपये जिंकले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"