शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ला, सहा जणांचा मृत्यू

By admin | Updated: June 4, 2017 10:44 IST

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात जवळपास 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 04 -ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात जवळपास 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.   येथील लंडन ब्रीजवरुन चालणा-या पादचा-यांना एका व्हॅन चालकाने उडविले यामध्ये वृत्त अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, दुसरीकडे एका रेस्टॉरन्टमध्ये एका व्यक्तीने लोकांवर चालू हल्ला केल्याने परिसरात खळबऴ माजली आहे. त्यामुळे एकंदरीत हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तविली जात असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू तर जवळपास 20 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा हल्ला करणाऱ्या तीन संशयितांना पोलिसांनी ठार केले आहे," अशी माहिती मार्क रोले या ब्रिटनच्या दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्याने दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, येथील प्रसिद्ध असलेल्या लंडन ब्रीजवर एका व्हॅन चालकाने पादचा-यांना चिरडल्याची घटना शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसर लॉक डाऊन केला आहे. व्हॅनच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. तसेच, या घटनेच्या पार्श्वभूमीवर लंडन ब्रीजवरील दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. या भागातील बसचे मार्गही बदलण्यात आले असून लंडनमधील भुयारी रेल्वे स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. या घटनेत अनेक पादचारी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे लंडन ब्रीजजवळच असलेल्या प्रसिद्ध बॉरो मार्केटमधील एका रेस्टॉरन्टमध्ये असलेल्या लोकांवर एका व्यक्तीने चाकू हल्ला आणि गोळीबार केल्याची घटना सुद्धा याचवेळी घडली. या घटनेतही अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच, वॉक्सहॉल परिसरात सुद्धा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हा हल्ला दहशतवादी असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.  
दरम्यान, इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा विभागाच्या अधिका-यांची आपत्कालीन बैठक बोलाविली असून त्यांनीही हा हल्ला दहशतवादी असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हटले आहे. तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांनी सुद्धा या घटनेच्या पार्श्वभूमीवर ट्विट करुन इंग्लंडला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. याचबरोबर, या घटनेचा अनेक एजन्सीकडून तपास करण्यात येत आहे. त्यामुळे लंडन ब्रीजच्या परिसरात नागरिकांनी जाऊ नये, असे ट्विट लंडन अ‍ॅम्बुलन्स सर्व्हिसने केले आहे.
याआधी ब्रिटनमधील पार्लमेंट परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला होता. या दहशतवादी हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू आणि 50 हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी  इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.