अमेरिकेतील एका प्रोफेसरचे छायाचित्र सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. प्रोफेसर डॉ. हेन्री मूसोमा हे एका लहान मुलाला कडेवर घेऊन शिकवत असल्याचे दिसत आहे. साहजिकच सर्वांना हा प्रश्न पडला की, कदाचित हे मूल त्यांचे असावे. पण, या वर्गातील विद्यार्थिनी एश्टन रॉबिन्सन हिने याबाबत खुलासा केला आहे. एक व्हिडिओ पोस्ट करुन तिने म्हटले आहे की, प्रोफेसर डॉ. हेन्री यांच्या कडेवरील मुलगा माझा आहे. या मुलाला सांभाळण्यासाठी त्या दिवशी कोणीच नव्हते म्हणून आपण डॉ. हेन्री यांना मी आज क्लासला येऊ शकत नाहीत, असे मेलवक कळवले. त्या मेलचे उत्तर देताना प्रोफेसर डॉ. हेन्री यांनी, लेक्चर मिस न करता आपल्या मुलाला क्लासमध्ये घेऊन यायला तिला सांगितले. ती क्लासमध्ये आली, तेव्हा हेन्री यांनी या मुलाला कडेवर घेऊन सर्र्व विद्यार्थ्यांना शिकविले.
मुलाला कडेवर घेऊन विद्यार्थ्यांना दिले धडे, सोशल मीडियावर छायाचित्र व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 04:36 IST