शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

लेबनॉनच्या पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांचे राजीनामे; बैरुतमधील स्फोटांनंतर आठवड्याभरात सरकार पायउतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 07:38 IST

बैरुतमधील स्फोटांमुळे देशातील जनक्षोभ वाढल्यानं पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

बैरुत: लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांच्यासह त्यांच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. गेल्या मंगळवारी लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये स्फोट झाले होते. त्यामुळे सरकारविरोधात असलेला जनक्षोभ वाढला. हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून सरकारबद्दलचा संताप व्यक्त केला. त्यानंतर आता पंतप्रधानांसह सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. सोमवारी देशाला संबोधित करत असताना पंतप्रधान हसन दियाब यांनी सरकार पायउतार होत असल्याची घोषणा केली. देशातल्या जनतेना बदल हवा आहे आणि लोकांची इच्छा लक्षात घेऊन आम्ही राजीनामा देत आहोत, असं दियाब म्हणाले. त्यांनी त्यांचा राजीनामा राष्ट्रपती मायकल आऊन यांच्याकडे सोपवला आहे. दियाब यांच्या आधी मंत्रिमंडळातल्या त्यांच्या काही सहकाऱ्यांनीदेखील राजीनामे दिले होते. मात्र त्यानंतरही जनक्षोभ कायम होता. सरकारनं पायउतार व्हावं, अशी मागणी जनतेकडून केली जात होती. गेल्या मंगळवारी लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये स्फोट झाले. त्यामध्ये २२० जणांचा मृत्यू झाला आहे. बैरुतचे राज्यपाल मरवान अबूद यांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटानंतर ११० जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा ठावठिकाणा अद्याप सापडलेला नाही. यातील बहुतांश जण परदेशी कर्मचारी आणि ट्रक चालक आहेत. या स्फोटांमध्ये जवळपास ६ हजार जण जखमी झाले. या स्फोटांनंतर लेबनॉनसमोरी आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. लेबनॉनमध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण अतिशय जास्त आहे. त्यामुळे जनता मेटाकुटीला आली आहे.