इस्रायलचे संरक्षण मंत्री कॅट्झ यांनी गाझा पट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य घुसविण्याची गोष्ट केली आहे. इस्रायलच्या सुरक्षा क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी इस्रायलने गाझाच्या एका मोठा भाग ताब्यात घेण्याची तयारी सुरु केली आहे. सध्यातरी इस्रायलने गाझावासियांना गाझा पट्टी खाली करण्याचे आदेश दिले आहेत.
गाझा पट्टीवर इस्रायल मोठी सैन्य कारवाई करणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर टँक पाठविण्यात येत आहेत. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या ठिकाण्यांना उध्वस्त करण्यासाठी इस्रायल गाझाचा ताबा करणार असल्याचे कॅट्झ यांनी म्हटले आहे. युद्ध क्षेत्रातातून गाझाच्या लोकांना बाहेर काढणे देखील या अभियानाचा भाग असणार असल्याचे ते म्हणाले.
गाझाच्या दक्षिणेकडील रफाह भागातील रहिवाशांना त्यांची घरे सोडून उत्तरेकडे जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इस्रायलच्या या मोठ्या कारवाईचे गेल्याच महिन्यात सीएनएनने वृत्त दिले होते. मोठा भाग साफ करण्यासाठी आणि ताब्यात घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने सैन्याला गाझात पाठविले जाणार असल्याचे यात म्हटले होते.
गाझा पट्टीत पुन्हा हमासच्या कारवाया वाढू लागल्याचे दिसताच इस्रायलने अमेरिकेने केलेली युद्धबंदी मोडून काढत अचानक हवाई हल्ले केले होते. पुन्हा हमास आपले हातपाय पसरून पुन्हा इस्रायलविरोधी कारवाया करू शकते. यामुळे गाझा पट्टीच खाली करून ती आपल्या संरक्षणासाठी वापरण्याचा निर्णय इस्रायलने घेतला आहे.
उर्वरित २४ अपहरणकर्त्यांची सुटका होईपर्यंत आमचे सैन्य गाझाच्या काही भागात कायमस्वरुपी तैनात राहणार असल्याचे इस्रायलने म्हटले होते. यानंतर हमासवर इस्रायलने हल्ले सुरु केले होते. यात शेकडो पॅलेस्टीनी नागरिक मारले गेले आहेत. आता गाझापट्टीतील अन्नसाठाही संपत आल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.