वॉश्गिंटन - अमेरिकाइस्रायलच्याइराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. गेल्या ४ दिवसांपासून इथली परिस्थिती चिघळत चालली आहे. त्यात अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने मध्य पूर्वेतील १४ देशांमधून आपल्या नागरिकांना तातडीने बाहेर पडण्याचा अलर्ट जारी केला आहे. सीरियस सेफ्टी रिस्क्स अलर्ट जारी करत अमेरिकन नागरिकांना या सूचना जारी केल्यात.
असिस्टेंट सेक्रेटरी ऑफ कॉन्सुलर अफेअर्सचे मोरा नामदार यांनी पोस्ट करत म्हटलंय की, मध्य पूर्वेतील गंभीर सुरक्षा धोक्यामुळे अमेरिकन नागरिकांनी ताबडतोब व्यावसायिक विमानांनी किंवा कोणत्याही उपलब्ध मार्गाने या देशातून बाहेर पडावे असं त्यांनी सांगितले. इराणने आखाती देशांमधील अमेरिकन दूतावास आणि सैन्य तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले वाढवले आहेत अशावेळी हा अलर्ट अमेरिकन नागरिकांसाठी देण्यात आला आहे.
रियाधमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला
सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अलीकडेच अमेरिकन दूतावास कार्यालयावर २ ड्रोन हल्ले झाले. या हल्ल्यामुळे इमारतीत छोटी आग लागली त्याशिवाय काही भाग कोसळला. या घटनेत कुणीही गंभीर जखमी अथवा जीवितहानी झाली नाही अशी माहिती सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. या हल्ल्यानंतर दूतावासाने रियाध, जेद्दा आणि धहरान येथील अमेरिकन नागरिकांना शेल्टर इन प्लेस म्हणजेच घरात राहा, बाहेर पडू नका असा सल्ला दिला आहे. अमेरिकन दूतावासावर झालेल्या हल्ल्यामुळे या परिसरात आगीचे धूर पसरले. ज्यातून संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्य पूर्वेतील १४ देशांमधून बाहेर पडण्याचा अलर्ट
मध्य पूर्वेतील संघर्ष पाहता अमेरिकन नागरिकांना १४ देशांमधून बाहेर पडण्यास सांगितले आहे. यामध्ये बहरीन, इजिप्त, इराण, इराक, इस्रायल, वेस्ट बँक आणि गाझा, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि येमेन यांचा समावेश आहे. हा धोका खूप गंभीर आहे त्यामुळे व्यावसायिक वाहनांनी तातडीने बाहेर पडा. अनेक विमानतळ बंद आहेत आणि उड्डाणे रद्द केली जात आहेत, परंतु उपलब्ध उड्डाणे वापरा आणि मदतीसाठी +१-२०२-५०१-४४४४ (परदेशातून) किंवा +१-८८८-४०७-४७४७ (अमेरिकेतून) हेल्पलाइनवर कॉल करा आणि STEP.gov वर नोंदणी करा असं आवाहन अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने केले आहे.
दरम्यान, अमेरिकेने आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी इमरजन्सी टास्क फोर्स सक्रीय केली आहे. परंतु बहुतेक लोक सध्या व्यावसायिक विमानांवर अवलंबून आहेत. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी तिथे असेल तर ताबडतोब परराष्ट्र विभागाची वेबसाइट तपासा आणि या देशातून निघण्याचा प्रयत्न करा असंही अमेरिकेने म्हटलं आहे.
Web Summary : Amid rising Middle East tensions, the US State Department urges citizens to immediately leave 14 countries due to security risks. Recent attacks, including one on the Riyadh embassy, prompted the alert. Americans should use commercial flights and register with STEP.gov for assistance.
Web Summary : मध्य पूर्व में बढ़ते तनाव के बीच, अमेरिकी विदेश विभाग ने सुरक्षा जोखिमों के कारण नागरिकों से 14 देशों को तुरंत छोड़ने का आग्रह किया है। रियाद दूतावास पर हमले सहित हालिया हमलों ने अलर्ट जारी करवाया। अमेरिकियों को व्यावसायिक उड़ानों का उपयोग करना चाहिए और सहायता के लिए STEP.gov पर पंजीकरण करना चाहिए।