शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या विद्यार्थ्याचा मृतदेह अमेरिकेत पडून; अंत्यसंस्कार नाही, परराष्ट्र खात्याचा ‘वीकेंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:22 IST

परराष्ट्र मंत्रालय व न्यूयॉर्क दूतावासाच्या अनास्थेमुळे लातूरच्या सुनील बिरादरचा मृतदेह १२ दिवसांनंतरही अमेरिकेत अंत्यसंस्काराविना आहे.

टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालय व न्यूयॉर्क दूतावासाच्या अनास्थेमुळे लातूरच्या सुनील बिरादरचा मृतदेह १२ दिवसांनंतरही अमेरिकेत अंत्यसंस्काराविना आहे. तो ओहियोतील विद्यापीठात अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेत होता. सुनील २७ आॅक्टोबरपासून बेपत्ता होता. तलावाजवळ त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती १ नोव्हेंबरला विद्यापीठाने त्याच्या नातेवाइकांना दिली.सुनीलचा मित्र रविशंकर याने परराष्ट्र मंत्रालय, न्यूयॉर्क दूतावासामध्ये संपर्क साधला. सुषमा स्वराज यांना टिष्ट्वट केले. मृतदेह भारतात पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर दूतावासाने तांत्रिक कारण सांगत, नंतर नकार कळविला. दहा दिवसांपासून सुनीलचे कुटुंबीय परराष्ट्र मंत्रालय, दूतावासाच्या संपर्कात आहे. मृतदेह मायदेशी आणण्याऐवजी तेथेच अंत्यसंस्कार करू देण्यास कुटुंबीयांनी होकार कळवल्यानंतर, ‘विकेंड’चे कारण सांगत अधिकाºयांनी अंत्यसंस्कारास पुन्हा विलंब केला. आजही सुनीलचा मृतदेह अंत्यसंस्काराविनाच आहे.मूळ उद्गीरचा असलेल्या सुनीलने पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले होते. त्याच्या संशयास्पद मृत्यूमागे घातपाताची शक्यता कुटुंबीयांनी वर्तविली होती. त्याच्या मृत्यूची माहिती दिल्यावर दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाने केवळ ई-मेल्सचे घोडे नाचविले.सुनीलचे नातेवाईक रविशंकर शीवशिवे म्हणाले की, मेल्सना उत्तर मिळाले, परंतु अंत्यसंस्कारासाठी तत्परता दाखविली नाही.