शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

२६/११ हल्ला: कसाबसह खात्मा झालेल्या १० दहशतवाद्यांसाठी पाकमध्ये प्रार्थना करतोय हाफिज सईद

By मोरेश्वर येरम | Updated: November 26, 2020 10:35 IST

मुंबईवरील  २६/११ हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानातील पंजाबच्या साहीवाल भागात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा राजकीय चेहरा असलेल्या जमात-उद-दवा संघटनेकडून प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. 

ठळक मुद्देहाफिज सईदने पाकिस्तानात आयोजित केली प्रार्थना सभादहशतवाद्यांसाठी प्रार्थना सभा आयोजित केल्याने संतापाची लाटमुंबईवरील  २६/११ हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण

नवी दिल्लीपाकिस्तानात राजकारणाचा बुरखा परिधान केलेल्या जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेने मुंबई हल्ल्यात मारले गेलेल्या १० दहशतवाद्यांसाठी आज प्रार्थना सभेचं आयोजन केलं आहे. 

मुंबईवरील  २६/११ हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानातील पंजाबच्या साहीवाल भागात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा राजकीय चेहरा असलेल्या जमात-उद-दवा संघटनेकडून प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. 

'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार जमात-उद-दवाचे प्राबल्य असलेल्या मशिदींमध्ये संघटनेची बैठक झाली असून २००८ च्या मुंबई हल्ल्यात तब्बल १७० जणांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या दहशतवाद्यांसाठी प्रार्थना करण्याचं निश्चित केलं गेलं आहे. 

मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात एकूण ९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्याला फाशी देण्यात आली. दरम्यान, भारताने या हल्ल्यासंदर्भात सर्व पुरावे जमा करुन हाफीस सईद हाच या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचा दावा केला. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने हाफिज सईद याच्यावर १० मिलियन डॉलरचं बक्षिस घोषित केलं आहे. 

हाफिज सईदने आज थेट मारले गेलेल्या दहशतवाद्यांसाठी प्रार्थना सभेचं आयोजन केल्यानं देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तान26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाMumbaiमुंबई