शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांत मोठी रेडिओ दुर्बीण उलगडणार विश्वाचे रहस्य; १७२ अब्जांचा निर्मिती खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 08:42 IST

चीनसह आठ देशांचा संयुक्त प्रकल्प

लंडन : जगातील सर्वांत मोठी रेडिओ दुर्बीण तयार करण्यात येत आहे. चीन, ब्रिटनसह आठ देशांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. त्यासाठी १७२ अब्ज रुपये खर्च होणार असून, ही दुर्बीण २०२८ मध्ये तयार होणार आहे. या प्रकल्पात भारतासह आणखी काही देश नजीकच्या काळात सहभागी होण्याची शक्यता आहे. 

२१ व्या शतकातील जे महत्त्वाकांक्षी विज्ञान प्रकल्प आहेत, त्यामध्ये या दुर्बिणीचाही समावेश आहे. स्क्वेअर किलोमीटर ॲरे (एसकेए) असे नाव दिलेल्या या दुर्बिणीचे महत्त्वाचे भाग ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेत बनविण्यात येत आहेत. या प्रकल्पाचे मुख्यालय लंडन येथे आहे. या दुर्बिणीच्या निर्मितीसाठी गेल्या ३० वर्षांपासून पूर्वतयारी केली जात होती.

वेग किती?या दुर्बिणीचे एक उपकेंद्र ऑस्ट्रेलियामध्ये कार्यरत असेल. एसकेए-लो असे त्याचे नाव असून, त्यात १,३१,०७२ अँटेना बसविले जाणार आहेत. कमी तीव्रतेचे रेडिओ संकेत गोळा करण्याचे काम एसकेए-लो करणार आहे. एसकेए रेडिओ दुर्बीण अत्यंत संवेदनशील असून, सध्या कार्यरत असलेल्या रेडिओ दुर्बिणींपेक्षा ती १३५ पट अधिक वेगाने आकाशातील घडामोडी टिपणार आहे.

भारत सहभागी होणार?एसकेए रेडिओ दुर्बीण बनविण्याच्या प्रकल्पात सध्या चीन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड या आठ देशांचा सहभाग आहे. लवकरच भारत, कॅनडा, स्वीडन, द. कोरिया, जपान हे पाच देश या प्रकल्पात सामील होण्याची शक्यता आहे. 

हायड्रोजन वायुबद्दल सखोल संशोधनअवकाशातील ग्रह, तारे, धुमकेतू, उल्का अशा अनेक घटकांकडून येणारे रेडिओ संकेत एकत्रित करण्याचे, तसेच त्याद्वारे खगोलशास्त्रातील गूढ गोष्टींवर प्रकाश टाकण्याचे काम एसकेए दुर्बिणीद्वारे केले जाणार आहे. परग्रहांवर सजीवसृष्टी आहे का या गोष्टीचाही या दुर्बिणीद्वारे शोध घेतला जाईल. अवकाशामध्ये विविध ग्रहताऱ्यांच्या भवतालात हायड्रोजन वायूचे अस्तित्व प्राचीन काळापासून आढळून येते. तिथे या वायूची निर्मिती कशी झाली असावी, याचाही अभ्यास एसकेए दुर्बिणीद्वारे करण्यात येईल.