शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळातून केवळ १ तासात उतरा पृथ्वीवर! चीनकडून जगातील सर्वात शक्तिशाली विंड टनेलची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 08:24 IST

विंड टनेलमुळे चीनच्या हायपरसॉनिक महत्त्वाकांक्षेचा विस्तार होणार आहे.

बीजिंग :चीनने उत्तर बीजिंगच्या हुआरो जिल्ह्यात जगातील सर्वात शक्तिशाली हायपरसॉनिक विंड टनेलची निर्मिती केली आहे. टनेल  जेएफ-२२चा व्यास चार मीटर इतका आहे. ते १० किलोमीटर प्रति सेकंदापर्यंत उच्च वायूप्रवाह गती निर्माण करू शकते, जे आवाजाच्या वेगाच्या ३० पट आहे.

विंड टनेलमुळे चीनच्या हायपरसॉनिक महत्त्वाकांक्षेचा विस्तार होणार आहे. या टनेलचा वापर अंतराळ वाहतूक यंत्रणा, हायपरसॉनिक विमानांसह लष्करी  संशोधनातही केला जाईल. या विंड टनेलची निर्मिती करण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी लागला असून, यामुळे अमेरिकेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.

२०३५ पर्यंत हायपरसॉनिक विमानांचा ताफा तैनात करण्याचे चीन सरकारचे उद्दिष्ट आहे. हा ताफा प्रवाशांना अंतराळात घेऊन तासाभरात पृथ्वीवर पोहोचण्यास सक्षम असेल. हायपरसॉनिक उड्डाणाच्या अभ्यासात विंड टेनल आदर्श प्रयोगशाळा ठरेल, असे संशोधकांचे मत आहे.

जगासाठी मोठा धोका

हायपरसॉनिक क्षेपणास्त्र रोखण्यासाठी जगात आजपर्यंत कोणतीही संरक्षण यंत्रणा नाही. जर चीनने विंड टनेलच्या माध्यमातून मॅक ३३चा वेग गाठला तर तो संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरू शकतो. याच्या मदतीने चिनी क्षेपणास्त्रे ताशी ४० हजार किलोमीटरचा वेग गाठू शकतात. त्यांना कोणताही देश रोखू शकत नाही. चीनकडे आधीच डीएफ-१७ नावाचे हायपरसॉनिक अँटी-शिप मिसाइल आहे.

शॉक वेव्हची घेतली मदत

- हवेचा प्रवाह निर्माण करण्यासाठी पारंपरिक विस्तार पद्धती वापरण्याऐवजी, चीनचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रोफेसर जियांग झोंगलिन यांनी नवीन शॉक वेव्ह निर्मितीचा प्रस्ताव दिला होता. 

- ही प्रणाली अचूक वेळेत स्फोटांच्या मालिकेच्या उपयोग शॉक वेव्ह तयार करण्यासाठी वापरते. यामुळे विंड टनेलमधील हवेचा प्रवास सर्वाधिक वेगवान होतो.

 

टॅग्स :chinaचीन