शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव यांच्या पत्नीच्या बुटात म्हणे ‘धातूची वस्तू’ होती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 04:02 IST

कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी चेतनकूल सोमवारी आली तेव्हा त्या जे बूट घालून आल्या होत्या त्यात ‘धातूची संशयास्पद वस्तू’ आढळली म्हणून त्यांना ते बूट भेटीनंतर परत दिले गेले नाहीत, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे.

इस्लामाबाद: हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी चेतनकूल सोमवारी आली तेव्हा त्या जे बूट घालून आल्या होत्या त्यात ‘धातूची संशयास्पद वस्तू’ आढळली म्हणून त्यांना ते बूट भेटीनंतर परत दिले गेले नाहीत, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे.पत्नी चेतनकूल व आई अवंती या दोघी सोमवारी इस्लामाबादमध्ये जाधव यांना भेटल्या तेव्हा त्यांना कशी अपमानास्पद वागणूक दिली गेली, याचे सविस्तर निवेदन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी जारी केले होते. त्यात भेटीनंतर जाधव यांच्या पत्नीची पादत्राणे वारंवार विनंती करूनही परत दिली गेली नाहीत, याचा उल्लेख होता. असे करण्यामागे पाकिस्तानचा काही वाईट हेतू असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही भारताने दिला होता.पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल यांनी भारताच्या या निवेदनावर प्रतिक्रिया देताना अशी मखलासी केली की, जाधव यांची पत्नी जे बूट घालून आली होती त्यात एक संशयास्पद धातूची वस्तू आढळली. ती नेमकी काय आहे याची ‘फॉरेन्सिक तपासणी’ करण्यासाठी त्यांचे बूट ठेवून घेण्यात आले व त्यांना घालायला लगेच दुसरी पादत्राणे देण्यात आली.जाधव यांच्या आई व पत्नीला भेटीसाठी जाताना मंगळसूत्र, बांगड्या व कपाळाची टिकलीही काढून ठेवायला सांगून पाकिस्तानने त्यांच्या धार्मिक व सांस्कृतिक भावनांचा अनादर केला, असे भारताचे म्हहणे होते. शिवाय त्या दोघींना घालून आलेले कपडे बदलून आत जायला सांगितले, असेही भारताने म्हटले होते. कथित सुरक्षेच्या कारणास्तव असे करण्याची काय गरज होती याचा खुलासा न करता डॉ. फैजल फक्त एवढेच म्हणाले की, या दोघींना भेटीसाठी जाताना जे जे काढून ठेवायला सांगितले गेले ते सर्व त्यांना भेटीनंतर परत देण्यात आले.काचेच्या तावदानाआडून घडविलेली भेट, त्यावेळी भारताचे उप उच्चायुक्त जे. पी. सिंग यांना आणखी एका काचेमागे उभे केले जाणे व पाकिस्तानी पत्रकारांना जाधव यांच्या आई व पत्नीच्या जवळ जाऊ दिल्याने त्यांच्याकडून या दोघींना उद्देशून आक्षेपार्ह विधाने केली जाणे, असे इतर आक्षेपही भारताने नोंदविले होते. त्या प्रत्येकाला उत्तर न देता पाकिस्तानने अशी भूमिका घेतली की, या सर्व बाबतीत त्याच वेळी हरकत घेता येऊ शकली असती. २४ तास उलटल्यानंतर या गोष्टींची वाच्यता करणे ही पश्चातबुद्धाने केलेली वायफळ बडबड आहे व त्यासंदर्भात भारताच्या तोंडाला लागण्याची आमची इच्छा नाही! (वृत्तसंस्था)>स्वराज यांचे आज संसदेत निवेदनसदस्यांनी व्यक्त केलेल्या भावना विचारात घेऊन या प्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज उद्या गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये निवेदन करून सरकारची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान