शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव खटल्यात नेमले तीन अ‍ॅमिकस क्युरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 01:57 IST

पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी जनरल खालीद जावेद खान यांनी पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तानात वकिली करण्याचा परवाना असलेल्या कोणत्याही वकिलास भारत सरकार जाधव यांची बाजू मांडण्यासाठी नेमू शकते.

इस्लामाबाद : हेरगिरी व दहशतवादी कृत्ये केल्याच्या आरोपावरून देहदंडाची शिक्षा झालेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या खटल्यामध्ये तीन पाकिस्तानी ज्येष्ठ वकिलांची अ‍ॅमिकस क्युरी म्हणून इस्लामाबाद उच्च न्यायालयाने नेमणूक केली आहे. जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्याकरिता भारताला ‘आणखी एक संधी’ देण्यात यावी, असे आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला दिले आहेत.पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अबीद हसन मंटो, हमीद खान व पाकिस्तानचे माजी अ‍ॅटर्नी जनरल मकदूम अली खान या तिघांची कुलभूषण जाधव खटल्यामध्ये अ‍ॅमिकस क्युरी म्हणून इस्लामाबाद उच्च न्यायालयाने नियुक्ती केली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी ३ सप्टेंबर रोजी विस्तारित खंडपीठासमोर होणार आहे.

पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी जनरल खालीद जावेद खान यांनी पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तानात वकिली करण्याचा परवाना असलेल्या कोणत्याही वकिलास भारत सरकार जाधव यांची बाजू मांडण्यासाठी नेमू शकते. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अतार मिनल्ला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सध्या सुनावणी सुरू आहे. जाधव यांच्याकरिता वकील नियुक्त करण्यासाठी भारताला आणखी एक संधी दिली पाहिजे, असे न्या. मिनल्ला यांनी सांगितले. कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी जर पाकिस्तानी वकील नेमला, तर त्याला साह्य करण्यासाठी भारतीय वकिलांचे पथक नेमण्यात येईल का, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अ‍ॅटर्नी जनरल खालीद जावेद खान म्हणाले की, असा कोणताही पर्याय विचारात नाही. कायदेशीर मदतीचा मार्ग रोखला; भारताची टीकाकुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळण्याचे सर्व मार्ग पाकिस्तानने रोखून धरले आहेत, असा आरोप भारताने गेल्या महिन्यात केला होता. जाधव यांच्याकरिता वकील नेमण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती पाकिस्तान सरकारने २२ जुलै रोजी उच्च न्यायालयाला केली होती. त्या फेरविचार याचिकेची सुनावणी दोन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे घेण्यात आली. कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तानने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेवर भारत सातत्याने टीकेची झोड उठवीत आहे.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान