America Israel Iran War:इस्रायलने शनिवारी सकाळी इराणविरोधात सैन्य कारवाई सुरू केली आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये जोरदार स्फोटाचे आवाज ऐकायला येत आहेत. राजधानीत कमीत कमी ३ मोठे स्फोट झाले आहेत. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी या हल्ल्यांची पुष्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात बॅक डोअर चर्चा सुरू होती. परंतु, अशातच हे हल्ले करण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, इराणच्या सुमारे ३० शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणविरोधात थेट युद्ध पुकारण्यामागे काय कारण आहे, अमेरिका आणि इस्रायल इराणला कोणती गोष्ट करण्यापासून रोखू इच्छित आहेत, यावर चर्चा सुरू झाली आहे.
१९ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता की, करार करण्यासाठी त्यांच्याकडे १० ते १५ दिवस आहेत. असे न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. १० दिवसांची मुदत संपताच ट्रम्प यांनी इराणवर हल्ला चढवल्याचे पाहायला मिळाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी संभाव्य हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर अवघ्या १० दिवसांनी अमेरिका आणि इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ हल्ला केला.
हल्ल्यांमुळे वाटाघाटीद्वारे तोडगा निघण्याच्या आशा धुळीस
अमेरिका आणि इस्रायलने हल्ला करण्यापूर्वीच अमेरिकेने इराणभोवती लष्करी सज्जता मजबूत केली होती. या हल्ल्यामुळे या परिसरातील तणाव वाढताना पाहायला मिळत आहे. रशिया, युरोपियन सरकार आणि संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. तसेच अमेरिका आणि इस्रायलने इराणवरील हल्ल्यांमुळे वाटाघाटीद्वारे तोडगा निघण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.
इराणवरील हल्ल्याचे कारण काय?
२०२५ मध्ये इराण-इस्रायल युद्ध आणि इराण समर्थित गटांशी झालेल्या संघर्षांमुळे इस्रायच्या नेत्यांनी जानेवारीमध्ये इराणला वारंवार इशारा दिला होता की, ते त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांचा अनियंत्रित विस्तार करू देणार नाहीत. परंतु, इराणने अशा कोणत्याही गोष्टींना जुमानले नाही. इराणने आपला संवेदनशील अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र संबंधित प्रक्रिया सुरूच ठेवल्या. अनेकदा इशारे देऊनही इराण थांबत नाही, असे दिसताच इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला चढवला, ज्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Web Summary : Israel launched military action against Iran, targeting multiple cities. Tensions escalated due to Iran's nuclear program and missile development, defying warnings from the US and Israel. Negotiations faltered amid rising regional instability.
Web Summary : इज़राइल ने ईरान के खिलाफ सैन्य कार्रवाई शुरू की, जिसमें कई शहरों को निशाना बनाया गया। ईरान के परमाणु कार्यक्रम और मिसाइल विकास के कारण तनाव बढ़ गया, जिसने अमेरिका और इज़राइल की चेतावनियों को खारिज कर दिया। बढ़ते क्षेत्रीय अस्थिरता के बीच बातचीत विफल हो गई।