शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

हुकूमशहा किम जोंगची पुन्हा सटकली! 'ही' गाणी ऐकल्यास 15 वर्षे लेबर कॅम्पमध्ये करणार कैद अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 09:17 IST

Kim Jong Un And North Korea : उत्तर कोरियामध्ये मनोरंजनाची साधने ही मर्यादित स्वरुपात आहेत. माध्यमे आणि इंटरनेटवर सेन्सॉरशिप लागू करण्यात आली आहे.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) हा त्याच्या क्रूरतेसाठी लोकप्रिय आहे. त्याचा क्रूर चेहरा हा सातत्याने जगासमोर येत असतो. त्याच्या अजब कायद्यांची नेहमीच चर्चा होत असते. किम जोंग उन याने आता के-पॉप प्रेमींना जाहीर धमकी दिली आहे. प्रशासनाने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पॉप गाणी ऐकणाऱ्यांना थेट 15 वर्षे श्रमिक शिबिरात (लेबर कॅम्प) काम करावे लागणार आहे. के-पॉप संगीत एखाद्या कॅन्सरसारखं असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियात कोरियन पॉप गाण्यांना के-पॉप म्हटलं जातं. मुख्यत: पाश्चिमात्य संगीतावर आधारीत असलेल्या के-पॉपमध्ये नृत्य आणि संगीतात नवीन ट्रेंड रुजत आहेत. त्यामुळे के-पॉपची लोकप्रियता जगभरात वाढत आहे. 

दक्षिण कोरियाचे टीव्ही शो, चित्रपटांनाही लोकप्रियता लाभत आहे. उत्तर कोरियामध्येही याची लोकप्रियता वाढत आहे. दक्षिण कोरियाच्या वाढत्या प्रभावाला लक्षात घेता उत्तर कोरिया सरकार सतर्क झाले आहे. उत्तर कोरियामध्ये मनोरंजनाची साधने ही मर्यादित स्वरुपात आहेत. माध्यमे आणि इंटरनेटवर सेन्सॉरशिप लागू करण्यात आली आहे. त्यामुळेच अनेकजण दक्षिण कोरियातून बेकायदेशीरपणे मनोरंजनासाठी तेथील संगीत, चित्रपटांच्या सीडी, डीव्हीडी मागवतात. सीमेवर तपासणी कठोर केल्यानंतर तस्करीचा मार्गही बदलण्यात आला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी नुकतीच या प्रकारावर कठोर टीका केली आहे. 

दक्षिण कोरियाई चित्रपट, नाटक आणि के-पॉप संगीताच्या माध्यमातून उत्तर कोरियातील समाजवादाविरोधात आणि सरकारविरोधात लोकांना चिथावणी देत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच आता किम जोंग उन यांच्या सरकारने सांस्कृतिक आक्रमण रोखण्यासाठी नवीन आदेश जारी केले आहेत. दक्षिण कोरियाचे संगीत, टीव्ही मालिका उत्तर कोरियातील भाषा, व्यवहार भ्रष्ट करत असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटले. डिसेंबर महिन्यातच याबाबतचा एक कायदा तयार करण्यात आला होता. यामध्ये दक्षिण कोरियातील कोणत्याही मनोरंजन विषयक साहित्याचा आस्वाद घेतल्यास 15 वर्ष श्रमिक छावणीत कैद व्हावे लागणार आहे. याआधी ही शिक्षा फक्त पाच वर्षे होती. तर, पेन ड्राइव्हची तस्करी करणाऱ्या दोषींना मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

...तर उत्तर कोरियातील नागरिकांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा! 

उत्‍तर कोरियाचा सनकी हुकूमशहा किम जोंग उन यांने नुकताच एक नवा कायदा आणला आहे. या कायद्यात, उत्‍तर कोरियातील परदेशी प्रभाव संपवण्यासाठी परदेशी चित्रपट, कपडे आणि अयोग्य भाषेचा वापर केल्यास मृत्यूदंडापासून ते कारागृहापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी, किम जोंग उनने एका व्यक्तीला, तो केवळ दक्षिण कोरियन चित्रपटासह पकडला गेला म्हणून मृत्यूदंड दिला होता. यून मि सो त्यावेळी 11 वर्षांची होती तेव्हा उत्‍तर कोरियन व्‍यक्तीला मृत्यूदंड देण्यात आला होता. त्यावेळी, त्याच्या शेजाऱ्यांनाही या मृत्यूदंडाची संपूर्ण प्रक्रिया पाहण्याचा आदेश देण्यात आला होता. सो ने बीबीसी सोबत बोलताना सांगितले, की जर तुम्ही ही मृत्यूदंडाची शिक्षा पाहिली नाही, तर तो राजद्रोह मानला जाईल. एवढेच नाही, तर अश्‍लिल व्हिडिओची तस्‍करी करून आणण्याची शिक्षा मृत्यूदंडही असू शकते, असेही उत्तर कोरियाचे सैनिक स्पष्ट करत होते.

 

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरियाSouth Koreaदक्षिण कोरियाmusicसंगीत