शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कमला हॅरिस यांची अल्प लोकशाही प्रक्रियेने उमेदवार म्हणून निवड, ट्रम्प यांच्या प्रचार अभियान टीमचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 13:18 IST

...हॅरिस यांच्या नावावर एकही मतदान झाले नाही. राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या निवडीसाठी राबवलेली प्रक्रिया साम्यवादी चीनची आठवण करून देणारी असल्याचा दावा करत ट्रम्प यांच्या टीमने हॅरिस यांच्यासाठी राबविलेल्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वॉशिंग्टन डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या अल्प लोकशाही प्रक्रियेने निवडल्या गेलेल्या उमेदवार असल्याचा आरोप शुक्रवारी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार अभियान टीमने केला. हॅरिस यांच्या नावावर एकही मतदान झाले नाही. राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या निवडीसाठी राबवलेली प्रक्रिया साम्यवादी चीनची आठवण करून देणारी असल्याचा दावा करत ट्रम्प यांच्या टीमने हॅरिस यांच्यासाठी राबविलेल्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमदेवाराच्या निवडीसाठीची निवड प्रक्रिया शुक्रवारी संपन्न झाली. यात भारतीय वंशाच्या ६९ वर्षीय कमला हॅरिस यांना प्रतिनिधींची मते मिळाली. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून नावाची घोषणा करण्यात आली. ५ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा सामना रिपब्लिक पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (७८) यांच्याशी होणार आहे.

देशाच्या लोकशाहीलाच धोकाडेमोक्रॅटिक पक्षाच्या लोकांमुळे देशाच्या लोकशाहीलाच खरा धोका असल्याचा आरोप ट्रम्प यांच्या टीमने केला आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत कमी लोकप्रिय उमेदवार कमला हॅरिस असून, स्वतःच्या नावावर त्यांना एकही मत मिळाले नाही. हॅरिस यांच्या निवडीसाठी राबविलेली प्रक्रिया ही साम्यवादी चीनची आठवण करून देणारी आहे. आरोग्याशी निगडित समस्या लपविणे शक्य नसल्याने डेमोक्रॅटिक पक्षांच्या नेत्यांना बायडेन यांचे नाव राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेतून हटवावे लागले. यानंतर त्यांनी अल्प लोकशाही प्रक्रियेने हॅरिस यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केल्याचा आरोप टीमने केला आहे.

टॅग्स :Kamala Harrisकमला हॅरिसDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका