शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कमला हॅरिस ८५ मिनिटांसाठी बनल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष; सर्वोच्चपदावर काम करणाऱ्या ठरल्या पहिल्या महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 04:03 IST

जॉर्ज डब्ल्यू बुश  २००२ व २००७ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनाही अशाच प्रकारे आपले अधिकार तत्कालीन उपाध्यक्षांकडे सोपवावे लागले होते. प्रशासकीय व्यवस्थेचा भाग म्हणून राष्ट्राध्यक्षांना संपूर्ण आरोग्य तपासणी करावी लागते. त्या काळात गरज भासल्यास असा निर्णय घेतला जातो. 

वॉशिग्टन : जगाची महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद शुक्रवारी ८५ मिनिटांसाठी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याकडे सोपवण्यात आले होते. काही मिनिटांसाठी का असेना, अमेरिकेच्या या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या कमला हॅरिस पहिल्या भारतीयच वंशाच्या नव्हे, तर पहिल्या आशियायी व्यक्ती ठरल्या. अमेरिकेच्या अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्याही त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. झाले असे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांची त्या दिवशी दैनंदिन आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातील कोलोनोस्कोपी चाचणीसाठी त्यांना काही वेळ भूल दिली जाणार होती. त्यामुळे या काळात राष्ट्राध्यक्षपदाचे सर्व अधिकार बायडन यांनी कमला हॅरिस यांना दिले होते. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे माध्यम सचिव जेन साकी यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जो बायडन यांची ही पहिली संपूर्ण शरीराची चाचणी होती. या तपासणीच्या काळात १९ नोव्हेंबरला अमेरिकी वेळेनुसार सकाळी १० वाजून १० मिनिटांनी राष्ट्राध्यक्षपदाचे सर्व अधिकार कमला हॅरिस यांच्याकडे सोपवण्यात आले. हे अधिकार त्यांच्याकडे ११ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, ८५ मिनिटांसाठी होते. आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर बायडन शुद्धीवर येताच पुन्हा हे अधिकार बायडन यांच्याकडे आले. चाचणीनंतर बायडन यांनी कमला हॅरिस आणि व्हॉईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ रोन क्लेन यांच्याशी चर्चा करून पुन्हा कार्यभार स्वीकारला.

आधी असे दोन वेळा घडले -जॉर्ज डब्ल्यू बुश  २००२ व २००७ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनाही अशाच प्रकारे आपले अधिकार तत्कालीन उपाध्यक्षांकडे सोपवावे लागले होते. प्रशासकीय व्यवस्थेचा भाग म्हणून राष्ट्राध्यक्षांना संपूर्ण आरोग्य तपासणी करावी लागते. त्या काळात गरज भासल्यास असा निर्णय घेतला जातो.  

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनKamala Harrisकमला हॅरिसAmericaअमेरिकाUSअमेरिका