शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

Video: संसदच बनली कुस्तीचा आखाडा; अध्यक्षांच्या आदेशानंतर झाला राडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 08:09 IST

Jordan Parliament Video : अध्यक्षांनी दिलेल्या आदेशानंतर काही खासदारांमध्ये हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. यात संसदेच्या सभागृहात खासदार लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारताना दिसत आहेत.

ससदेत चर्चांदरम्यान अनेकदा आरोप-प्रत्यारोप होताना आपण पाहिलं असेल. आता जॉर्डनच्या संसदेत असे काही घडलं की, ते पाहून सर्वच जण अवाक् झाले आहेत. संसदेच्या सभागृहात काही खासदार एकमेकांशी भिडले, इतकंच नाही तर त्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनीही मारहाण केली. संसदेतील या हाणामारीचा व्हिडीओही आता समोर आला आहे.

जॉर्डनच्या संसदेत मंगळवारी हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. ससंदेच्या कामकाजादरम्यान जेव्हा अध्यक्षांनी एका खासदाराला बाहेर जाण्याचे आदेश दिले, त्यानंतर ससंदेच्या सभागृहात गदारोळ झाला. त्या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार एकमेकांशीच भिडले. यानंतर एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार अचानक एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. तसंच यात एकमेकांना मारहाण करतानाही दिसत आहे. १ मिनिटांपेक्षा अधिक असलेल्या या व्हिडीओमध्ये अनेक खासदार मारहाणी दरम्यान एकत्र येत असल्याचं दिसत आहे. तसंच त्या ठिकाणी सुरू असलेली आरडाओरडही ऐकू येत आहे. काही मीडिया रिपोर्ट्नुसार जॉर्डनच्या संसदोश संविधान दुरुस्तीबाबत चर्चा सुरू होती. यादरम्यान, एका खासदाराच्या वर्तणूकीमुळे कामाकाजात बाधा येत असल्याचं सांगत अध्यक्षांनी त्यांना बाहेर जाण्याचे आदेश दिले. यानंतर सर्व खासदार एकमेकांशी भिडले. यामद्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. जॉर्डनमध्ये आतापर्यंत २९ वेळा संविधानात दुरुस्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :ParliamentसंसदInternationalआंतरराष्ट्रीय