शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: दोन अमेरिकन कंपन्या मोठ्या प्रमाणात लस तयार करणार; कोरोनाला रोखण्यात यश येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 12:22 IST

जॉन्सन अँड जॉन्सन आणि मोडर्ना कंपन्यांसोबत अमेरिकन सरकारचा करार

वॉशिंग्टन: कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून सध्या अमेरिका या विषाणूचा केंद्रबिंदू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेन सरकारनं जॉन्सन अँड जॉन्सन आणि मोडर्ना कंपन्यांशी करार केला आहे. कोरोना आटोक्यात आणणाऱ्या सुरक्षित आणि कार्यक्षम लसींचा शोध अद्याप लागलेला नाही. मात्र जॉन्सन अँड जॉन्सन आणि मोर्डना कंपन्या लसींचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार आहेत. यामुळे कोरोनाला रोखण्यात यश येऊ शकतं. याशिवाय आणखी दोन कंपन्यांसोबत अमेरिकन सरकार करार करणार आहे.कोरोना विषाणूला आळा घालणारी लस अद्याप तरी जगभरातल्या शास्त्रज्ञांना सापडलेली नाही. सध्या जगभरात कोरोनाचे पावणे आठ लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. तर ३७ हजारांपेक्षा अधिक जणांना यामुळे जीव गमवावा लागला आहे. चीन, युरोप पाठोपाठ आता अमेरिकेला कोरोनाचा फटका बसला आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या दीड लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे अमेरिकन सरकारनं जॉन्सन अँड जॉन्सन आणि मोडर्ना कंपन्यांशी करार केला आहे. कोरोनावरील सुरक्षित लस तयार होण्यासाठी पुढील वर्ष उजाडेल. तोपर्यंत तयार होणाऱ्या लसींची लाखो लोकांवर चाचणी घेण्यात येईल. काल जॉन्सन अँड जॉन्सननं अमेरिकेन सरकारसोबत १ बिलियन डॉलरचा करार करत असल्याची घोषणा केली. कंपनी १ बिलियन लसींचं उत्पादन करणार आहे. या घोषणेनंतर जॉन्सन अँड जॉन्सनच्या समभागांची किंमत ८ टक्क्यांनी वधारली. जॉन्सन अँड जॉन्सन सप्टेंबरनंतर लसीची चाचणी सुरू करेल. मोडर्ना कंपनीनं याच महिन्याच्या सुरुवातीला काही व्यक्तींवर लसीची चाचणी घेतली. मोडर्नानं अमेरिकन सरकारच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाच्या बायोमेडिकल ऍडव्हान्स्ड रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑथरिटीसोबत (बार्डा) करार केला आहे. यानंतर मोडर्नाच्या समभागांच्या किमतीत १.४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. कोरोनावर लवकरात लवकर लस शोधली जावी यासाठी अमेरिकन सरकारनं जॉन्सन अँड जॉन्सन आणि मोडर्नासोबत करार केले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका