शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्यो बायडेन यांच्या पत्‍नीनं ट्रम्प यांच्या पत्नीला चहा-पाणासाठी बोलावलं, मिळालं धक्कादायक उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 17:31 IST

खरे तर, हे निमंत्रण नाकारण्यामागे, मेलानिया या बायडेन दाम्पत्यावर नाराज असल्याचे कारण सांगितले जात आहे...

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. यानंतर, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी अर्थाता राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या पत्नी जिल यांनी, डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांना औपचारिक भेटीसाठी आणि चहापानासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. मात्र मेलानिया यांनी त्यांचे हे निमंत्रण नाकारले आहे.

खरे तर, हे निमंत्रण नाकारण्यामागे, मेलानिया या बायडेन दाम्पत्यावर नाराज असल्याचे कारण सांगितले जात आहे. कारण, 2022 मध्ये, एफबीआयकडून त्याच्या फ्लोरिडातील निवासस्थानाची झडती घेण्यात आली होती. तेव्हापासूनच त्या या दाम्पत्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

द न्‍यूयॉर्क पोस्‍टने दिलेल्या वृत्तानुसार, मेलानिया यांनी जिल बायडेन यांच्यासोबत, अशी कुठल्याही प्रकारची भेट नाकारली आहे. खरेतर, अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर, जाणाऱ्या आणि व्‍हाइट हाऊसमध्ये नव्याने येणाऱ्या फर्स्‍ट लेडी यांच्यात औपचारिक परिचयाची परंपरा आहे. यामुळे, जिल बायडेन यांनी तीच परंपरा पुढे सुरू ठेवण्याच्या उद्देशाने मेलानिया यांना आमंत्रण पाठवले होते. मात्र, मेलानिया यांनी भेटण्यास नकार दिला आहे.

द न्‍यूयॉर्क पोस्‍टच्या मते, जिल यांचे पती राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी एफबीआयला ट्रम्प यांच्या घराच्या झडतीचे आदेश दिले होते. या झडतीत एफबीआयने त्यांच्या अंडरवेअर ड्रॉवरचीही झडती घेतली होती. यामुळे मेलानिया नाराज आहेत.

महत्वाचे म्हणजे, 2016 मध्ये राष्‍ट्रपती बराक ओबामा यांच्या पत्‍नी मिशेल यांनी दिलेले निमंत्रण मेलानिया यांनी स्वीकारले होते आणि त्या चहा-पाणासाठी व्‍हाइट हाऊसमध्ये गेल्या होत्या. मात्र, 2020 मध्ये ट्रम्प दाम्पत्याने ही परंपरा पाळली नव्हती. 

टॅग्स :AmericaअमेरिकाMelania Trumpमेलेनिया ट्रम्पJoe Bidenज्यो बायडनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प