शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

अमेरिकेचा आधी हमासला विरोध, आता इस्रायलला दिलं टेन्शन; गाझापट्टीच्या सुरक्षेबद्दल पहिल्यांदाच केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 18:53 IST

Israel Hamas War: इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझापट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. गाझामध्ये युद्धापूर्वी बांधलेल्या मोठमोठ्या इमारती इस्रायलच्या हल्ल्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. इस्रायली ...

Israel Hamas War: इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझापट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. गाझामध्ये युद्धापूर्वी बांधलेल्या मोठमोठ्या इमारती इस्रायलच्या हल्ल्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. इस्रायली सैन्य अजूनही हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करत आहे. यादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी प्रथमच आंतरराष्ट्रीय समुदायाला युद्धानंतर अंतरिम कालावधीसाठी गाझा पट्टीची सुरक्षा व्यवस्थापित करण्यात मदत करण्याचे आवाहन केले. वॉशिंग्टन पोस्टच्या ऑप-एडमध्ये, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींवर हल्ले करणार्‍या हिंसक इस्रायली वसाहतींना प्रवेश बंद करण्याची धमकी दिली. दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यानंतर पत्रकार परिषद घेताना पॅलेस्टिनी प्राधिकरण म्हणजेच PA सध्याच्या स्वरूपात गाझा पट्टीवर राज्य करण्यास योग्य नाही, असे सांगितले.

पीएचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी इस्रायलवर गाझामध्ये नरसंहार केल्याचा आरोप केला आहे. बायडेनने आपल्या लेखात लिहिले की, संकटानंतर लगेचच, आंतरराष्ट्रीय समुदायाने गाझाला मदत करण्यासाठी अंतरिम सुरक्षा उपायांसह संसाधनांची व्यवस्था करण्यास वचनबद्ध केले पाहिजे. गाझाच्या दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुनर्निर्माण यंत्रणा स्थापन करावी, असे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सांगितले. यासोबतच, गाझा किंवा वेस्ट बँकमधून पुन्हा कधीही दहशतवादी धोका निर्माण होणार नाही हे ठरवावे लागेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, जो बायडेन यांचा प्रस्ताव जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री अयमान सफादी यांनीही फेटाळला. त्यांनी मनफा सुरक्षा मंचला सांगितले की युद्धानंतर कोणतेही अरब सैन्य गाझामध्ये तैनात केले जाणार नाही कारण जेरुसलेमशी अम्मानचे संबंध बिघडलेले आहेत.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन