शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जेफ बेजोस यांच्या यानातून 6 जणांची अंतराळ यात्रा; 107 KMचा प्रवास, एक तिकीट 10 कोटींना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 17:52 IST

न्यू शेपर्ड अंतराळ यानाने टेक्सासमधील प्रक्षेपण साइट येथून उड्डाण केले. या यानाद्वारे पृथ्वीपासून वर 107 किमीचा प्रवास करण्यात आला आणि त्यानंतर हे अंतराळवीर पॅराशूटद्वारे पृथ्वीवर परतले.

टेक्सास: अंतराळ प्रवासाबाबत जगातील काही देश खूप पुढे गेले आहेत, यात अमेरिका टॉपवर आहे. यातच इलोन मस्क यांच्या स्पेस-एक्स आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या 'ब्लू ओरिजिन' कंपनीने खासगी अंतराळ सेवा सुरू केली आहे. गुरुवारी ब्लू ओरिजिनचे यान सहा जणांना घेऊन अंतराळात गेले. 

न्यू शेपर्ड अंतराळ यानाने टेक्सासमधील प्रक्षेपण साइट वन येथून उड्डाण केले. या यानातून पृथ्वीपासून वर 107 किमीचा प्रवास करण्यात आला आणि त्यानंतर हे अंतराळवीर पॅराशूटद्वारे पृथ्वीवर परतले. या अंतराळ मोहिमेला फक्त 10 मिनिटे 20 सेकंद लागले. यावेळी अंतराळयानाचा कमाल वेग 2,239 mph, म्हणजे 3,603 किलोमीटर प्रतितास इतका होता.

ब्लू ओरिजिनचा विक्रम या उड्डाणासह ब्लू ओरिजिनने नवा विश्वविक्रमही केला आहे. इजिप्त आणि पोर्तुगालचे लोक पहिल्यांदाच अंतराळ पर्यटनाचा भाग बनले. अभियंता सारा साबरी ही पहिली इजिप्शियन आणि उद्योजक मारियो फरेरा अंतराळात जाणारी पहिली पोर्तुगीज बनली आहे. या स्पेस ट्रिपमध्ये कोबी कॉटन, यूट्यूब चॅनल ड्यूड परफेक्टचे सह-संस्थापक, ब्रिटिश-अमेरिकन गिर्यारोहक व्हेनेसा ओ'ब्रायन, तंत्रज्ञान नेते क्लिंट केली थर्ड आणि दूरसंचार कार्यकारी स्टीव्ह यंग यांचाही समावेश होता.

असा होतो अंतराळ प्रवास न्यू शेपर्ड स्पेसक्राफ्टमध्ये रॉकेट आणि कॅप्सूल असते. अंतराळात गेल्यानंतर कॅप्सूल रॉकेटमधून बाहेर पडते. यानंतर, कॅप्सूल पृथ्वीवर उतरेपर्यंतचा वेळ 10-11 मिनिटे असतो. या दरम्यान अंतराळवीरांना काही काळ अंतराळातील वातावरण जाणवते. यानंतर पॅराशूटद्वारे कॅप्सूल पृथ्वीवर परतते. हे रॉकेट SpaceX च्या Falcon 9 ऑर्बिटल रॉकेटप्रमाणेच काम करते.

सुमारे 10 कोटी रुपयांचे तिकीटक्वार्ट्जच्या अहवालानुसार, ब्लू ओरिजिनच्या स्पेसक्राफ्टच्या तिकिटाची किंमत $1.25 दशलक्ष किंवा 9,89,73,750 रुपये आहे. ब्लू ओरिजिनने आतापर्यंत 6 वेळा अंतराळ प्रवास केला आहे. कंपनीने आतापर्यंत 31 लोकांना अंतराळात सफर घडवली आहे. ब्लू ओरिजिनने गेल्या वर्षी जुलैमध्ये बेझोससह तीन जणांना अवकाशात पाठवून या मोहिमेची सुरुवात केली होती.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनInternationalआंतरराष्ट्रीय