शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बिल गेट्स नव्हे, आता 'हा' अवलिया आहे या विश्वाचा नवा कुबेर!

By sagar.sirsat | Updated: July 27, 2017 23:14 IST

जगातील कुबेरांच्या पंक्तीवर गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवणा-या मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स या श्रीमंतांच्या राज्याचे राज्य खालसा

ठळक मुद्देजगातील कुबेरांच्या पंक्तीवर गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवणा-या मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स या श्रीमंतांच्या राज्याचे राज्य खालसा रोज आपण ज्या वेबसाइटवरून स्वस्तात काही ना काही वस्तू खरेदी करण्याची इच्छा बाळगत असतो अशा अ‍ॅमेझॉनच्या मालकाने आता मायक्रोसॉफ्टच्या सर्वेसर्वाला श्रीमंतांच्या क्रमवारीत मागे सोडले आहे.जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स हे मे 2013 पासून अव्वल होते.

नवी दिल्ली, दि. 27 - जगातील कुबेरांच्या पंक्तीवर गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवणा-या मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स या श्रीमंतांच्या राज्याचे राज्य खालसा झाले आहे. जगाच्या सर्वात श्रीमंतांच्या गादीवर आता नवाच ‘धीश’ येऊन स्वार झाला आहे. हा नवा राजा आहे इ-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनचे फाउंडर जेफ बेझोस. रोज आपण ज्या वेबसाइटवरून स्वस्तात काही ना काही वस्तू खरेदी करण्याची इच्छा बाळगत असतो अशा अ‍ॅमेझॉनच्या मालकाने आता मायक्रोसॉफ्टच्या सर्वेसर्वाला श्रीमंतांच्या क्रमवारीत मागे सोडले आहे.

यासंदर्भात ब्लूमबर्गने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार 2013 पासून सर्वात श्रीमंतांच्या यादीत अव्वल असणारे मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांना बेझोस यांनी मागे टाकले आहे.कसे झाले बेझोस सर्वश्रीमंत?बिल गेट्स यांना मागे टाकणे तसे सोपे नव्हते. पण, अ‍ॅमेझॉन कंपनीच्या स्टॉक्समध्ये तेजी आली आणि बेझोस यांनी बिल गेट्स यांना मागे टाकले. गुरूवारी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज सुरू होताच अ‍ॅमेझॉनचे शेअर 1.3 टक्क्यांच्या तेजीसह 1,065 डॉलरवर उघडले. त्याचा थेट फायदा बिजोस यांना झाला. अन् त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा बिल गेट्स यांच्यापेक्षा मोठा झाला.बेझोस यांचा अमेझिंग स्पीडअ‍ॅमेझॉन या वेबसाइटवरून खरेदी करणा-यांची संख्या जशी झपाट्याने वाढते आहे तशीच बेझोस यांची संपत्ती वाढण्याचा स्पीडही अमेझिंग आहे. गेल्या वर्षभरात सर्वात जलदगतीने संपत्तीत वाढ होणा-या अब्जाधीशांपैकी एक अशी बेझोस यांची ओळख आहे. वर्षभरात बेझोस यांची संपत्ती 24.5 अब्ज डॉलरनी (1.28 लाख कोटी रुपये) वाढली आहे. तर बिल गेट्स यांच्या संपत्तीमध्ये केवळ 8.5 अब्ज डॉलरचा नफा झाला आहे.किती आहे या दोघांची संपत्ती?अ‍ॅमेझॉनचे शेअर्स वधारल्याने बेझोस यांच्या संपत्तीत 1.4 अब्ज डॉलरची भर पडली. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती 90.9 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. बिल गेट्सपेक्षा त्यांची संपत्ती अधिक झाली आहे. बिल गेट्स यांची संपत्ती 90.7 अब्ज कोटी असल्याचे ब्लुमबर्गच्या अहवालात म्हटले आहे.