शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जपानचा सत्ताधारी पक्ष निवडणूक हरला; तरीही शिगेरू इशिबा पुन्हा पंतप्रधान बनले, कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 20:02 IST

इशिबा यांनी १ ऑक्टोबरला पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. यानंतर त्यांनी अचानक मतदानाची घोषणा केली होती. पंतप्रधान बनले असले तरी अल्पमतात त्यांना सरकार चालविण्याची कसरत करावी लागणार आहे. 

जपानमध्ये दोन आठवड्यांपूर्वीच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टी (एलडीपी) ला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. तरी देखील शिगेरू इशिबा पुन्हा पंतप्रधान बनले आहेत. 

२७ ऑक्टोबरला जपानमध्ये निवडणूक झाली होती. यामध्ये ४६५ सदस्यांच्या सभागृहात एलडीपीने बहुमत गमावले होते. सत्ताधाऱ्यांच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. निकाल लागला तरी ३० दिवसांत नवीन नेता निवड करणे गरजेचे होते. यामुळे सोमवारी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते. संसदेत गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच मतदान घेण्यात आले. 

यावेळी इशिबा यांनी विरोधी उमेदवार योशिहिको नोडा यांचा पराभव केला. इशिबा यांना २२१ आणि नोडा यांना १६० मते मिळाली. यानंतर इशिबा यांनी गेल्या सरकारचेच मंत्री कायम ठेवले. फक्त तिघेजण पुन्हा निवडून न आल्याने त्यांचे मंत्रिपद बदलण्यात आले आहे. 

इशिबा यांनी १ ऑक्टोबरला पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. यानंतर त्यांनी अचानक मतदानाची घोषणा केली होती. पंतप्रधान बनले असले तरी अल्पमतात त्यांना सरकार चालविण्याची कसरत करावी लागणार आहे. 

इशिबा कसे निवडून आले?जपानच्या संसदेत खासदारांना आपला पसंतीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडण्याची मुभा आहे. यानुसार इशिबा यांच्या पक्षाच्या खासदारांनी २२१ मते दिली, तर विरोधी पक्षाच्या नेत्याला १६० मते पडली. परंतू उरलेली ७६ मते ही त्या खासदारांनी त्यांच्या पसंतीच्या इतर उमेदवारांना दिली. यामुळे इशिबा यांना बहुमत मिळाले व त्यांना विजयी घोषित करण्यात आले. 

टॅग्स :JapanजपानElectionनिवडणूक 2024