शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा होणार जापानचे नवे पंतप्रधान, पुढच्या महिन्यात स्विकारणार पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 13:14 IST

एका वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी आजारपणामुळे पद सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुगा यांना पंतप्रधान बनवण्यात आलं होतं.

जापानचे माजी डिप्लोमॅट फुमियो किशिदा देशाचे पुढील पंतप्रधान होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. किशिदा यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची निवडणूक जिंकली आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुार, निवडणूक जिंकताच किशिदा यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

किशिदा यांनी जापानच्या परराष्ट्र मंत्रीपदाचे कामही पाहिले आहे. त्यांनी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रमुख योशीहिदे सुगा यांची जागा घेतली आहे. एका वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी आजारपणामुळे पद सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुगा यांना पंतप्रधान बनवण्यात आलं होतं.

पुढच्या महिन्यात मिळेल जबाबदारी

लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीला किशिदांच्या रुपात एक नवा नेता मिळाला आहे. सोमवारी संसदेत पंतप्रधानांच्या नावावर निर्णय घेण्यात येईल, तेव्हाच किशिदा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. किशिदांचा पक्ष संसदेवर नियंत्रण ठेवतो आणि आघाडीचा पक्ष म्हणून सरकारचा भाग आहे.

किशिदा यांनी जापानचे लसीकरण मंत्री असलेल्या तारो कोनो यांचा पराभव केला आहे. कानो व्यतिरिक्त, शर्यतीत साने ताकीची आणि सेको नोडा या दोन महिला उमेदवारही होत्या. पण दोघीही पहिल्या फेरीनंतर बाहेर पडल्या. पक्ष नेतृत्वाची निवडणूक जिंकल्यानंतर आता ते पुढील महिन्यात देशाचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारतील.

किशिदा यांचा परिचय 

किशिदा यांचा जन्म 29 जुलै 1957 रोजी मिनामी कु, हिरोशिमा येथील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही राजकारणी होते. किशिदा यांनी क्रेडिट बँक ऑफ जापानमध्ये बराच काळ काम केले. यानंतर त्यांची प्रतिनिधी सभागृहात सचिव म्हणून नियुक्ती झाली. 1993 मध्ये ते प्रतिनिधी सभागृहात निवडून आले आणि हिरोशिमामधून खासदार म्हणून येथे पोहोचले. 2007 ते 2008 पर्यंत, त्यांनी ओकिनावा व्यवहार मंत्री म्हणून अबे कॅबिनेटमध्ये काम केले आणि नंतर फकुडाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. 2008 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जोशुआ फाकुडा यांनी त्यांना ग्राहक व्यवहार आणि अन्न सुरक्षा राज्यमंत्री केले होते. त्यानंतर 2012 ते 2017 पर्यंत जपानचे परराष्ट्र मंत्री होते. 

 

टॅग्स :JapanजपानInternationalआंतरराष्ट्रीय