शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

चीनविरोधात 'पाच का पंच'; ड्रॅगनची कोंडी करण्यासाठी पाच बड्या देशांची आघाडी

By कुणाल गवाणकर | Updated: January 7, 2021 18:24 IST

दक्षिण आणि पूर्व चिनी समुद्रात चीनला रोखण्यासाठी पाच देश एकत्र

टोकियो: दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी अमेरिका आणि जपाननं नवी रणनीती आखली आहे. अमेरिका, जपाननं चीनला रोखण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीलादेखील आमंत्रित केलं आहे. तर दुसरीकडे चीननं वेगानं आपल्या लष्कराचं आधुनिकीकरण सुरू केलं आहे. जमिनीपाठोपाठ पाण्यातही चीननं अतिशय आक्रमकपणे हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे इतर देश सतर्क झाले आहेत.२०२१ मध्ये युरोपातल्या मोठ्या देशांनी आपल्या सामरिक रणनीतीत इंडो पॅसिफिक क्षेत्राला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळेच पुढील काही महिने ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका एलिजाबेथ आणि तिचा स्ट्राईक ग्रुप पूर्व आशियात तैनात असणार आहे. तर फ्रान्स आपली एक युद्धनौका जपानकडे पाठवणार आहे. यासोबतच जर्मनीदेखील एक विनाशिका जपानी नौदलाकडे पाठवणार आहे.चीनला लगाम घालण्यासाठी अमेरिका आणि जपान युरोपीय देशांची मदत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी त्यांचे जर्मन समकक्ष एनेग्रेट क्रॅम्प-कर्रेनबॉयर यांच्याशी १५ डिसेंबरला ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला. युरोपसोबत संरक्षण सहकार्य करण्याची क्षमता जपानमध्ये असल्याचं यावेळी किशी म्हणाले. त्यावर इंडो-पॅसिफिक क्षेत्रात घडणाऱ्या घटनांचा परिणाम जर्मनी आणि युरोपवरदेखील होतो, अशी प्रतिक्रिया एनेग्रेट क्रॅम्प-कर्रेनबॉयर यांनी दिली. दक्षिण चिनी समुद्र आणि पूर्व चिनी समुद्रात चीननं आपल्या हालीचाली वाढवल्या आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आलं आहे. दोन्ही समुद्रांमध्ये असलेल्या निर्जन बेटांवर चीननं सैनिकी तळ उभारले आहेत. चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे अनेक देश नाराज आहेत. त्यामुळेच सध्या चीनचे जपान, ब्रुनेई, मलेशिया, फिलिपीन्स, तैवान आणि व्हिएतनाम यांच्यासह अनेक देशांसोबत वाद सुरू आहेत.

टॅग्स :chinaचीनFranceफ्रान्सAmericaअमेरिकाGermanyजर्मनी