शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 20:35 IST

Japan Earthquake: भूकंपाचा केंद्रबिंदू आओमोरी आणि होक्काइडो प्रांताच्या किनाऱ्याजवळ समुद्राखाली अंदाजे ५० किलोमीटरवर होता.

Japan Earthquake: जपानच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ आज सोमवारी ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. या घटनेनंतर जपानच्या हवामान एजन्सीने (JMA) तातडीने ईशान्येकडील किनारपट्टी भागासाठी त्सुनामीचा इशारा जारी केला असून, ३ मीटर (सुमारे १० फूट) उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू आओमोरी आणि होक्काइडो प्रांताच्या किनाऱ्याजवळ समुद्राखाली अंदाजे ५० किलोमीटरवर होता. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, आओमोरी प्रांतात जपानच्या ७-बिंदू भूकंपाच्या तीव्रतेच्या स्केलवर ६+ तीव्रता नोंदवली गेली. या तीव्रतेमुळे भागातील लोकांना उभे राहणे आणि चालणेही कठीण झाले होते. जपान हवामान एजन्सीने किनारपट्टीवरील नागरिकांना क्षणभरही विलंब न करता तत्काळ सुरक्षित आणि उंच ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.

त्सुनामीचा इशारा जारी झाल्यानंतर सरकारी यंत्रणा अलर्टवर असून, सार्वजनिक प्रसारक NHK ने या भागातील सर्व नागरिकांना टीव्ही आणि रेडिओवरील सूचनांकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. विशेषतः, या भागातील अणुऊर्जा प्रकल्पांवर भूकंपाचा काही परिणाम झाला आहे का, याची तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे. सध्यापर्यंत कोणत्याही मोठ्या नुकसानीचे वृत्त नाही, मात्र संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन अत्यंत सावधगिरी बाळगत आहे.

जपान हा देश भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने येथे भूकंपाचे धक्के वारंवार जाणवतात. परंतु, ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा गंभीर मानला जातो, कारण अशा लाटा किनारी भागातील घरांचे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान करू शकतात. स्थानिक नागरिकांनी जुन्या आठवणी आणि नुकसानीचा धोका टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. हा इशारा रद्द होईपर्यंत लोकांनी किनाऱ्यापासून दूर राहावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Strong Japan Quake Triggers Tsunami Warning; Evacuations Ordered

Web Summary : A powerful 7.2 magnitude earthquake struck off Japan's northern coast, prompting a tsunami warning and evacuation orders. Waves up to 3 meters are possible. Residents are urged to move to higher ground as authorities assess potential damage, especially at nuclear plants.
टॅग्स :JapanजपानEarthquakeभूकंप