शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! विजांचा कडकडाट, इमारती जोरजोराने हलू लागल्या...; भूकंपाची भीषणता दाखवणारे Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 18:29 IST

Japan Earthquake : भूकंपाची भीषणता दाखवणारे आणि अंगावर काटा आणणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

टोकियो - जपानमध्ये फुकुशिमा किनारपट्टीच्या भागात 7.3 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. त्यामुळे या परिसरातील 20 लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच या भागात त्सुनामी येण्याचा धोका असल्याचा इशाराही देण्यात आला. जपानच्या हवामान खात्याने सांगितले की, समुद्रात 60 किमी खोल हा भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाची भीषणता दाखवणारे आणि अंगावर काटा आणणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. जपानमधील एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये आकाशात विजांचा कडकडाट पाहायला मिळत आहे. 

शहरातील सर्व घरं आणि इमारती देखील जोरजोराने हलताना दिसत आहे. यानंतर वीज पुरवठा खंडीत झाला. आणखी एक व्हि़डीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ट्रेनचे डब्बे हलताना दिसत असून सपोर्ट हँडलही वेगाने हलत आहेत. सुपरमार्केट्समधील सर्व सामना देखील भुकंपाच्या धक्काने खाली पडलं आहे. ऑफिसमधील कम्युटरसह सर्व सामानाचं मोठं नुकसान झालं आहे. जपानची राजधानी टोकियोजवळ बुधवारी रात्री झालेल्या भूकंपामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. भूकंपामुळे 2 जणांचा मृत्यू झाला, तर 88 जण जखमी झाले. दरम्यान, या ठिकाणी धावती बुलेट ट्रेन रुळावरून घसरल्याने भूकंपाची तीव्रता किती आहे, याचा अंदाज येतो.

जपानमधील मियागी आणि फुकुशिमा प्रांतात भूकंपाचे सर्वाधिक धक्के जाणवले. दोन्ही प्रांतांमध्ये लोकांना किनारी भागापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. फुकुशिमामध्ये भूकंपामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली. जापानमध्ये आलेल्या भूकंपामुळे धावती बुलेट ट्रेन रुळांवरून घसरली. जपानच्या बुलेट ट्रेन ऑपरेटर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तोहोकू येथे बुलेट ट्रेन रुळावरून घसरली. त्यावेळी ट्रेनमध्ये 100 प्रवासी होते. परंतु यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. जपानच्या ईस्ट निप्पॉन कंपनीच्या म्हणण्यानुसार, अनेक एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 

ओसाकीमधील तोहोकू एक्स्प्रेसवे, मियागी प्रांतातील जबान एक्स्प्रेसवे आणि सोमा, फुकुशिमा यांचा समावेश आहे. भूकंपानंतर उत्तर जापानच्या एका मॉलमध्येही मोठं नुकसान झालं आहे. तसंच यानंतर टोक्योमध्ये इलेक्ट्रीसिटी गेल्यानं 20 लाख घरांमध्ये अंधार पसरला आहे. याच भागात मार्च 2011 मध्ये 9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता व त्यानंतर त्सुनामीची लाट आली होती. त्यावेळी फुकुशिमा दाईची अणुप्रकल्पातील शीतकरण प्रक्रिया बंद पडली होती. बुधवारी झालेल्या भूकंपानंतर मियागी व फुकुशिमा भागात समुद्रात एक मीटर उंचीपर्यंतच्या त्सुनामीच्या लाटा उसळतील अशी शक्यता आहे. या भूकंपाने टोकियोसह अनेक भागांतील इमारतींना हादरे बसले. 

टॅग्स :JapanजपानEarthquakeभूकंप