शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

जेकब झुमा पायउतार होताच कोसळले 'गुप्ता साम्राज्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 15:16 IST

दक्षिण आफ्रिकेच्या सत्ता आणि उद्योग वर्तुळात वावरणारे आणि गेली चार वर्षे दक्षिण आफ्रिकेतील महत्वांच्या लोकांमध्ये नाव असणाऱ्या अजय, अतुल, राजेश या गुप्ता बंधुंच्या साम्राज्याला उतरती कळा लागली आहे.

ठळक मुद्दे1990 दशकात सुरुवातीच्या वर्षांमध्ये गुप्ता कंपनी भारतातून दक्षिण आफ्रिकेत गेली. खाणउद्योगाबरोबर अनेक व्यवसायांध्ये त्यांनी बस्तान बसवलं फिरण्यासाठी त्यांनी स्वतःचं जेट विमानही घेतलं. केप-टाऊनपासून दुबईपर्यंत त्यांनी मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे आलिशान बंगले बांधले.

जोहान्सबर्ग- दक्षिण आफ्रिकेच्या सत्ता आणि उद्योग वर्तुळात वावरणारे आणि गेली चार वर्षे दक्षिण आफ्रिकेतील महत्वांच्या लोकांमध्ये नाव असणाऱ्या अजय, अतुल, राजेश या गुप्ता बंधुंच्या साम्राज्याला उतरती कळा लागली आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी पदत्याग केल्यानंतर या गुप्ता बंधुंचे दिवस झपाट्याने फिरले आहेत. गेले अनेक महिने गुप्ता बंधुंवर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. लग्नसमारंभात पाहुण्यांची ये-जा करण्यासाठी अत्यंत सुरक्षित अशा लष्करी तळाचा वापर करणे, सरकारी कंपन्यांमध्ये आपले लोक विविध पदांवर बसवणे, नेमणुका करण्यासाठी कॅबिनेटमधील सदस्यांवर प्रभाव टाकणे, मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर होत होते. मात्र केवळ तपास चालू आहे असे सांगत तपास यंत्रणांनी कोणतीही प्रत्यक्ष कारवाई त्यांच्यावर केली नव्हती.मात्र ही सगळी परिस्थिती 14 फेब्रुवारी रोजी बदलली. राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली. गुप्तांच्या जोहान्सबर्गमधील सॅक्झनवर्ल्ड येथील आलिशान अशा संकुलावर छापा टाकण्यात आला तसेच त्यांच्या अनेक सहकार्यांना अटक झाली. इतकेच नाही तर गुप्तां बंधूंमधील ज्येष्ठ बंधू अजयला फरार घोषित करण्यात आले.

गुप्ता साम्राज्य दक्षिण आफ्रिकेत कसे उभे राहिले?1990 दशकात सुरुवातीच्या वर्षांमध्ये गुप्ता कंपनी भारतातून दक्षिण आफ्रिकेत गेली. खाणउद्योगाबरोबर अनेक व्यवसायांध्ये त्यांनी बस्तान बसवलं. फिरण्यासाठी त्यांनी स्वतःचं जेट विमानही घेतलं. केप-टाऊनपासून दुबईपर्यंत त्यांनी मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे आलिशान बंगले बांधले. जेकब झुमांचा मुलगा दुदुझेन हा त्यांचा व्यवसायात भागीदारच झाला तर त्यांच्या एका पत्नीला कंपनीचे कर्मचारी करण्यात आले. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची ये जा करण्यासाठी त्यांनी वॉटरक्लूफ हवाईतळाचा वापर केल्यानंतर 2013 साली गुप्तांचं नाव एकदम चर्चेत आले. अर्थराज्यमंत्री मकेबिसी जोनास यांनी व्यवसायासाठी विविध सवलती दिल्या तर आपल्याला अर्थमंत्री करु अशी ऑफर गुप्ता बंधुंनी दिल्याचा आरोप केला होता आणि त्यासाठी झालेल्या बैठकीचे आयोजन जेकब झुमांचा पुत्र दुदुझेनने केले होते असाही त्यांचा आरोप होता. गुप्ता आणि झुमा या दोघांनीही हे आरोप फेटाळले होते.  त्यानंतर अनेक माध्यमांमध्ये गुप्ता बंधुंच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येऊ लागली. त्यांच्या विविध पार्ट्यांमध्ये बोलावलेल्या पाहुण्यांची यादीही प्रसिद्ध झाली होती. जेकब झुमा राष्ट्राध्यक्षपदी असल्याने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आता मात्र त्यांच्या साम्राज्याला कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :South Africaद. आफ्रिका