शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

Jack Ma Missing: जॅक मा अचानक प्रकटले; व्हिडीओद्वारे दिला संदेश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 11:16 IST

Jack Ma Missing: ग्लोबल टाईम्सने मा यांना इंग्रजी शिक्षक ते उद्योजक बनल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांची ओळख सांगताना कुठेही अली बाबाचा उल्लेख केलेला नाही.

बिजिंग : चीनच्या व्याजखोरीवर बोलणारे अलीबाबाचे मालक आणि अब्जाधीश उद्योगपती जॅक मा गेल्या काही दिवसांपासून गायब झाले होते. आज ते जगासमोर अचानक प्रकटले आहेत.  जगभरातून मा यांच्याबाबत प्रश्न विचारले जात असताना चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने जॅक मा यांचा एक व्हिडीओ जाहीर केला आहे. यानुसार मा यांनी बुधवारी चीनच्या ग्रामीण भागातील 100 शिक्षकांसोबत व्हिडीओ लिंकद्वारे संवाद साधला आहे. मा यांनी सांगितले की, जेव्हा कोरोना व्हायरस संपेल तेव्हा आपण पुन्हा भेटू. 

ग्लोबल टाईम्सने मा यांना इंग्रजी शिक्षक ते उद्योजक बनल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांची ओळख सांगताना कुठेही अली बाबाचा उल्लेख केलेला नाही. खरेतर अलीबाबाची स्थापना मा यांनीच केली होती. गेल्या काही महिन्यांपासून चीनमध्ये अफवांचा बाजार गरम झाला आहे. अलीबाबावर चीन सरकार कब्जा करू शकते, असे बोलले जात आहे. त्याआधी जगभरात प्रसिद्ध असलेले जॅक मा हे गायब झाल्याने मोठ्या अफवा उठल्या होत्या. गेल्या ऑक्टोबरमध्ये मा यांनी चिनी सरकारच्या व्याजखोर संस्था आणि सरकारी बँकांविरोधात वक्तव्य केले होते. 

चीन का त्रास देतेय? अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्याकडे ग्राहकांची माहिती आहे. त्यांच्याकडे असलेल्या माहितीचं मोल त्यांच्या संपत्तीइतकंच मोठं आहे. चीनमधील कम्युनिस्ट सरकारला हीच माहिती मा यांच्याकडून हवी आहे. यासाठी सरकारकडून बऱ्याच कालावधीपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र मा यांनी अशा प्रकारचा तपशील देण्यास विरोध केला आहे. जॅक मा यांच्या एंट समूहाकडे कोट्यवधी ग्राहकांचा तपशील आहे. चीनमधील वित्तीय नियामक संस्थेला हा तपशील हवा आहे. त्यासाठी मा यांच्यावर बराच दबाव आणला जात आहे.

चीनच्या देखरेखीखाली...जागतिक पातळीवर जॅक मा यांच्या बेपत्ता होण्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर चीनचे सरकारी वृत्तपत्र 'पीपल्स डेली'ने जॅक मा यांच्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या वृत्तपत्रानुसार, जॅक मा यांना एका अज्ञातस्थळी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच चिनी सरकारकडून जॅक मा यांना देश सोडून न जाण्याची ताकीद दिली आहे, अशी माहिती एका अहवालातून देण्यात आली आहे. जॅक मा यांच्या बेपत्ता होण्यामागे चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेला वाद कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे. 

टॅग्स :Jack Maजॅक माAlibabaअलीबाबाchinaचीन