शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:09 IST

US Iran Ceasefire Islamabad talk : अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वन्स इस्लामाबादमध्ये चर्चा करणार आहेत. पाकिस्तानच्या मध्यस्थीने होणाऱ्या या चर्चेकडे जगाचे लक्ष.

गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या भीषण संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर, आता प्रत्यक्ष शांतता चर्चेसाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वेन्स हे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे रवाना झाले आहेत. या चर्चेत पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावणार असल्याने दक्षिण आशियातील राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. अशातच इराण या चर्चेला काहीच अर्थ नसल्याचे सांगत असल्याने या सीझफायर चर्चेवर संशयाचे ढग दाटू लागले आहेत. 

शनिवारपासून (११ एप्रिल २०२६) इस्लामाबादमध्ये ही ऐतिहासिक चर्चा सुरू होणार आहे. जे. डी. वेन्स यांच्यासोबत या शिष्टमंडळात विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि राष्ट्राध्यक्षांचे जावई जॅरेड कुशनर यांचाही समावेश आहे. दुसरीकडे, इराणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ करणार असल्याचे समजते.

पाकिस्तानची भूमिका आणि सुरक्षा व्यवस्थाया चर्चेसाठी इस्लामाबादला जणू 'किल्ल्याचे' स्वरूप आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांशी असलेल्या संबंधांमुळे पाकिस्तानने या संकटात मध्यस्थ म्हणून पुढाकार घेतला आहे. मात्र, या चर्चेत 'लेबनॉन' विषयाचा समावेश असेल की नाही, यावरून इराण आणि अमेरिका यांच्यात अद्याप मतभेद आहेत.

युद्धविराम की कायमस्वरूपी शांतता?सध्या हा युद्धविराम केवळ १४ दिवसांसाठी आहे. या काळात दोन्ही बाजू अणू कार्यक्रम, प्रादेशिक सुरक्षा आणि व्यापारावरील निर्बंध यांसारख्या कळीच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. जर ही चर्चा यशस्वी झाली, तर मध्य पूर्वेतील युद्धाचे ढग ओसरू शकतात. मात्र, इस्रायलने अद्याप आपला पवित्रा मवाळ केलेला नसल्याने या शांतता चर्चेच्या यशाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US-Iran Peace Talks: Vance Heads to Pakistan, Iran Skeptical

Web Summary : Amid US-Iran tensions, VP Vance is in Pakistan for peace talks. Iran expresses skepticism, casting doubt on ceasefire discussions. Pakistan mediates, focusing on nuclear programs and regional security. The world watches, hoping for lasting peace, despite Israeli reservations.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरAmericaअमेरिकाIranइराणPakistanपाकिस्तान