शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लोक काय म्हणतात यापेक्षा बाळाचं पोट भरणं महत्त्वाचं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 20:06 IST

बिश्केक, दि.31 जुलै- 1ऑगस्टपासून 7 ऑगस्टपर्यंत जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. ऑस्ट्रेलियातील खासदार लॅरिसा वाटर्स यांनी संसदेचे कामकाज सुरु असताना बाळाला स्तनपान करु दिले होते. दुर्देवाने तिच्या या कृत्याकडे एक सहज घटना म्हणून पाहण्याऐवजी त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकाच झाली होती. स्तनपान आठवड्याच्या पार्श्वभूमीवर अशीच काहीशी घटना किरगिझिस्तानमध्ये घडली आहे. किरगिझिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची ...

बिश्केक, दि.31 जुलै- 1ऑगस्टपासून 7 ऑगस्टपर्यंत जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. ऑस्ट्रेलियातील खासदार लॅरिसा वाटर्स यांनी संसदेचे कामकाज सुरु असताना बाळाला स्तनपान करु दिले होते. दुर्देवाने तिच्या या कृत्याकडे एक सहज घटना म्हणून पाहण्याऐवजी त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकाच झाली होती.

 स्तनपान आठवड्याच्या पार्श्वभूमीवर अशीच काहीशी घटना किरगिझिस्तानमध्ये घडली आहे. किरगिझिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची मुलगी आलिया शागियेवाने आपल्या बाळाला दूध पाजताना काढलेले फोटो प्रसिद्ध केले होते. माझ्या बाळाला गरज असेल तेथे आणि तेव्हा मी त्याला दूध पाजेन अशी कॅप्शनही तिने त्या फोटोंबरोबर प्रसिद्ध केली होती. त्यामुळे तिच्यावर जबरदस्त टीका करण्यात आली. राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने असं काही करणं लोकांना आजिबात रुचलं नाही. त्यांनी तिला ते फोटो काढायला लावले.

    सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झालेले स्तनपानाचे फोटो आलियाने मागे घेतले असले तरी तिची मतं ठाम आहेत. 'माझे शरीराकडे अश्लील म्हणून पाहण्याची काय गरज आहे? बाळाला दूध पाजणं हे त्याचे पोट भरण्यासाठी होतं. त्याला सेक्शुअलाइज करण्याची गरज नाही.' आलियाने फोटो प्रसिद्ध केल्यावर तिचे बाबा आणि किरगिझिस्तानचे अध्यक्ष अल्माझबेक आत्माबायेव व तिच्या आईनेही नापसंती व्यक्त केली होती. आलिया म्हणते, त्यांची परिस्थिती समजण्यासारखी आहे. आमची पिढी त्यांच्यापेक्षा कमी कर्मठ आहे. बाळाचं पोट भरणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, लोक काय म्हणतात हे मह्त्त्वाचं नाही.

आलियाप्रमाणे मध्यतंरी ब्राझीलियन खासदारही संसदेमध्ये भाषणाच्या वेळेस बाळाला स्तनपान करत असल्याचे छायाचित्र जगभर प्रसिद्ध झाले होते. दुर्देवाने याकडे एक सहज घटना किंवा बाळाच्या दिनक्रमाचा एक भाग असे न पाहता त्याच्याकडे अश्लील, अनैतिक असे लेबल लावले जाते.