शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 17:53 IST

Israel-Iran War: आता इस्रायल सुद्धा इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इस्रायल इराणवर मोठा हल्ला करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

Israel-Iran War: इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख नेता सय्यद हसन नसरल्लाह याचा मृत्यू झाला. यानंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष आता पेटला आहे. यातच, इराणने प्रत्युत्तर देत इस्रायलवर हल्ला केला आहे. इराणकडून इस्रायलवर जवळपास १८० क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. आता इस्रायल सुद्धा इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इस्रायल इराणवर मोठा हल्ला करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

इराणच्या आण्विक शस्त्रागारावर इस्रायल हल्ला करण्याचीही शक्यता आहे. विशेष म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनाही इस्रायलच्या विरोधकांकडून हिरवा कंदील मिळाला आहे. इस्रायलचे माजी पंतप्रधान आणि कट्टर विरोधी पक्षनेते नेफ्टाली बेनेट यांनी मोठा संकेत दिला असून एक प्रकारे नेतान्याहू यांना हिरवा सिग्नल दिला आहे. नेफ्टाली बेनेट यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलसाठी ५० वर्षांतील ही पहिली मोठी संधी आहे. त्यांनी पुढे लिहिले आहे की, इस्रायलने आता इराणच्या आण्विक केंद्रावर हल्ला केला पाहिजे.

दरम्यान, नेफ्टाली बेनेट यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा इस्रायल इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. याचबरोबर, मध्यपूर्वेतील युद्ध अशा टप्प्यावर पोहोचले आहे, जिथे आता थेट अमेरिका सहभागी झाली आहे. इराणने केलेल्या इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर मोठे देश सक्रिय झाले आहेत. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांनी लगेच इराणवर टीका करण्यास सुरुवात झाली.

दुसरीकडे, इराणच्या लष्कराने मंगळवारी रात्री इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यात प्रामुख्याने लष्करी आणि सुरक्षा आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या निवेदनाचा हवाला देत, आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सने पुष्टी केली आहे की,  इराणकडून इस्रायलच्या दिशेने मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. इस्रायलने प्रत्युत्तर दिल्यास आणखी एक हल्ला करण्याची धमकी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने दिली आहे. मात्र, या हल्ल्यानंतर आता इस्रायल शांत बसणार नसल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsraelइस्रायलIranइराण