शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 09:17 IST

इस्त्रायलने हिजबुल्लाह विरोधात आणखी एक कारवाई केली आहे. हिजबुल्लाहच्या नव्या चीफला इस्त्रायलने केले लक्ष्य.

काही दिवसापूर्वी इस्त्रायने मोठी कारवाई करत हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरुल्लाह यांची हत्या केली.  यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला. आता इस्त्रायलने आणखी कारवाया वाढवल्या आहेत, आता हिजबुल्लाहचा नवा चिफ हाशिम सफीद्दीन इस्त्रायलच्या टारगेटवर आहे. काल त्याला लक्ष्य करत हल्ला केला. लेबनीजच्या अहवालाचा हवाला देऊन, इस्रायली माध्यमांनी दावा केला आहे की IDF ने बेरूतच्या दाहेह उपनगरात हाशेम सफीद्दीनला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. इस्रायलचा हल्ला या आधीच्या हल्ल्यांपेक्षा मोठा होता.

अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने गुरुवारी मध्यरात्री बेरूतवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. त्यावेळी सफीद्दीन भूमिगत बंकरमध्ये हिजबुल्लाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक करत होते, असे सांगण्यात येत आहे. इस्रायलने नसराल्लाहला ठार मारल्यानंतर हा या भागातील सर्वात प्राणघातक बॉम्बस्फोट होता. इस्रायली अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, की स्ट्राइकमध्ये सफीद्दीनसह प्रमुख हिजबुल्ला नेत्यांच्या बैठकीला लक्ष्य करण्यात आले.  इस्त्रायली संरक्षण दल किंवा लेबनॉनमधील हिजबुल्लाकडून याबाबत कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

आयडीएफने बेरूतसह दक्षिणी लेबनॉनमधील भागांवर हल्ला केला. बेरूतमध्ये अनेक मोठे स्फोट झाले, यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हाशिम सफीद्दीनला २०१७ मध्ये अमेरिकेने दहशतवादी घोषित केले होते. ते सध्या हिजबुल्लाच्या राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून दहशतवादी संघटनेच्या जिहाद परिषदेचा सदस्यही आहे. नसराल्लाह आणि नईम कासिम यांच्यासह हिजबुल्लाच्या प्रमुख तीन नेत्यांमध्ये सफीद्दीन यांची गणना होते. हाशिम सफीद्दीन इस्रायलच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. संघटनेच्या लष्करी कारवायांची आखणी करणाऱ्या जिहाद कौन्सिलचे ते अध्यक्ष आहेत. 

इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले

इस्रायल एकीकडे लेबनॉन आणि इराणशी संघर्ष करत आहे, तर दुसरीकडे गाझावरही त्याचे सातत्याने हल्ले सुरू आहेत. दरम्यान, आता इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) गुरुवारी पॅलेस्टिनी संघटना हमासच्या तीन सर्वोच्च नेत्यांचा खात्मा केल्याची माहिती दिली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझा सरकारचा प्रमुख रावी मुश्ताहा याचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, हमास कमांडर समेह सिराज आणि समेह औदेह हेदेखील मारले गेले आहेत. 

या कारवाईची माहिती देताना IDF ने सांगितले की, इस्रायली सैन्याने गाझा पट्टीमध्ये सुमारे तीन महिन्यांपूर्वी हवाई हल्ले केले होते, ज्यात हमासचे तीन वरिष्ठ नेते रावी मुश्ताहासह समेह सिराज आणि समेह औदेह ठार झाले. तिघेही उत्तर गाझामधील भूमीगत बंकरध्ये लपले होते. या जागेचा वापर कमांड आणि कंट्रोल सेंटर म्हणून केला जायचा. तीन महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईबाबत इस्रायलने आता खुलासा केला आहे.

टॅग्स :Israelइस्रायल