शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

युद्धात मुलानंतर भाच्याचा मृत्यू; इस्रायली मंत्र्याने घेतली शपथ, "बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 13:27 IST

Israel-Hamas War : ईसेनकोट यांचा भाचा माओर मीर कोहेनचा गाझा पट्टीत हमासविरुद्ध लढताना मृत्यू झाला. मंत्र्यांचा मुलगा गॅल मीर ईसेनकोटचाही काही दिवसांपूर्वी गाझामधील युद्धादरम्यान मृत्यू झाला होता.

इस्रायल संरक्षण दलाचे माजी प्रमुख आणि युद्ध मंत्रिमंडळाचे विद्यमान मंत्री गादी ईसेनकोट यांनी गाझा युद्धात आपल्या मुलानंतर आता आपला भाचा गमावला आहे. ईसेनकोट यांचा भाचा माओर मीर कोहेनचा गाझा पट्टीत हमासविरुद्ध लढताना मृत्यू झाला. मंत्र्यांचा मुलगा गॅल मीर ईसेनकोटचाही काही दिवसांपूर्वी गाझामधील युद्धादरम्यान मृत्यू झाला होता.

माओर मीर कोहेन हा गाझामध्ये तैनात होता. तो ईसेनकोटची सावत्र बहीण शेरोन ईसेनकोट आणि मायकल मिशेल कोहेन यांचा मुलगा होता. माओर आणि गॅलच्या पालकांनी त्यांचं नाव आजोबा मीर यांच्या नावावरून ठेवलं होतं. 7 डिसेंबर रोजी उत्तर गाझा पट्टीमध्ये झालेल्या लढाईत सार्जंट मेजर (रिझर्व्ह सर्व्हिसेस) गॅल मीर ईसेनकोटला आपला जीव गमवावा लागला. तो बटालियन 699 मध्ये रिझर्व्हिस्ट म्हणून कार्यरत होता.

जेव्हा ईसेनकोट यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाली, तेव्हा ते मंत्री बेनी गॅंट्झ यांच्यासमवेत एका दौऱ्यावर होते. गॅलवर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याला निरोप देण्यासाठी हजारो लोक जमले होते. आपल्या मुलाला निरोप देताना गादी ईसेनकोट म्हणाले, "माझ्या लहान मुला गॅलुश, तुझी आई आणि मी शेवटचा तुमचा सन्मान करण्यासाठी येथे आलो आहोत."

7 ऑक्टोबरच्या भयंकर दिवसाची आठवण करून, गादी ईसेनकोट यांनी द जेरुसलेम पोस्टला सांगितलं की त्याचा मुलगा गॅल युद्धासाठी तयार झाला होता. तो म्हणाला, 'हमासला संपवण्यासाठी त्याने गाझा युद्ध महत्त्वाचं मानलं आहे'. ईसेनकोट  यांनी गॅलसाठी शपथ घेतली की त्याचं आणि इतर सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. इस्रायल एक मजबूत, प्रगतीशील आणि न्यायपूर्ण देश राहील, जसा तुम्हाला नेहमी हवा होता असंही म्हटलं आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध