शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

हृदयद्रावक! "श्वास घेऊ शकत नाही..."; मृत्यूपूर्वी कुटुंबाचा शेवटचा मेसेज व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 12:59 IST

हमासच्या रॉकेट हल्ल्यानंतर हे कुटुंब प्रथम 'सेफ रूम'मध्ये गेलं. त्यानंतर त्यांनी नातेवाईक आणि मित्रांना मेसेज करायला सुरुवात केली.

हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलमध्ये भीषण परिस्थिती आहे. दहशतवाद्यांनी लोकांच्या घरात घुसून त्यांची हत्या केली आहे. यामध्ये इस्रायली अमेरिकन कुटुंबाचाही समावेश होता. मृत्यूपूर्वी त्यांनी नातेवाईकांना शेवटचा मेसेज पाठवला होता, जो आता जोरदार व्हायरल होत आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, घराचे प्रमुख योनातन केदम सिमन टोव यांनी त्यांची बहीण रेनी बटलरला पाठवलेल्या मेसेजमध्ये "ते येथे आहेत. ते आम्हाला जाळत आहेत. आम्ही श्वास घेऊ शकत नाही असं म्हटलं आहे. 

35 वर्षीय टोव, त्याची 35 वर्षीय पत्नी तामार, 6 वर्षांच्या जुळ्या मुली शाहर आणि अरबेल, 4 वर्षांचा मुलगा ओमर आणि 70 वर्षांची आई कॅरोल यांना दहशतवाद्यांनी ठार केलं. गाझा सीमेजवळ असलेल्या किबुत्झच्या निर ओजमध्ये हे लोक राहत होते. हमासच्या रॉकेट हल्ल्यानंतर हे कुटुंब प्रथम 'सेफ रूम'मध्ये गेलं. त्यानंतर त्यांनी नातेवाईक आणि मित्रांना मेसेज करायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी सांगितले की आम्ही ठीक आहोत आणि शेल्टरमध्ये आहोत. अशाच प्रकारे आणखी अनेक मेसेज पाठवण्यात आले. पण तासाभराने मेसेज येणं बंद झालं.

हमासचे दहशतवादी त्यांच्या घरात घुसले आणि सेफ रूममध्ये पोहोचले. यानंतर त्यांच्याकडून कोणालाच मेसेज पाठवला गेला नाही. मैत्रीण यिशाई लाकोवने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की, 'आम्ही तामारला अनेक वर्षांपासून ओळखतो, कारण तिने विद्यापीठाच्या अभ्यासादरम्यान मला एका खास कार्यक्रमात नेलं. आमचे हृदय तुटलं आहे. दुष्ट मारेकर्‍यांनी संपूर्ण कुटुंबाची हत्या केली, मुलं आणि पालकांना केवळ ज्यू असल्यामुळे गोळ्या घातल्या. हे असह्य आहे!'

यिशाईने पुढे लिहिलं की, "इस्रायलमधील आमचे भाऊ, मित्र आणि शेजारी... सर्वांना कर्तव्यासाठी बोलावण्यात आले आहे आणि त्यांच्यापैकी बरेच गाझा सीमेकडे जात आहेत. त्यांपैकी बरेच जण गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात पत्नी आणि लहान मुलांना सोडून जात आहेत. भीती आणि तणाव आश्चर्यचकित करणारा आहे आणि आम्ही सैनिकांचे हात बळकट करून त्या सर्वांना सुखरूप घरी परत आणण्यासाठी देवावर विश्वास ठेवतो." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायल