शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गाझातील रफाह शहर रिकामे करण्याचा इस्रायलचा इशारा, हमासविरुद्ध मोठ्या आक्रमणाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 10:50 IST

Israel-Hamas war : गाझा पट्टीत दक्षिणेकडील सर्वांत मोठे रफाह शहर तातडीने रिकामे करावे, असे आदेश इस्रायलच्या लष्कराने सोमवारी दिले. हमासविरुद्ध नवीन मोठे अभियान सुरू करण्याचे हे संकेत मानले जात आहेत.

दीर अल-बला : गाझा पट्टीत दक्षिणेकडील सर्वांत मोठे रफाह शहर तातडीने रिकामे करावे, असे आदेश इस्रायलच्या लष्कराने सोमवारी दिले. हमासविरुद्ध नवीन मोठे अभियान सुरू करण्याचे हे संकेत मानले जात आहेत. या महिन्याच्या प्रारंभी इस्रायल व हमासदरम्यान झालेल्या युद्धबंदी कराराची मुदत संपताच इस्रायलने या गाझा भागात पुन्हा जोरदार हल्ले सुरू केले असून, जमिनीवरून थेट युद्ध सुरू केले आहे. 

मार्चच्या प्रारंभीच इस्रायलने या भागात २० लाख पॅलेस्टिनींचा अन्न, इंधन, औषधांचा पुरवठा बंद केला होता. या माध्यमातून हमासवर युद्धबंदी करारातील काही बदल स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्याचा इस्रायलचा प्रयत्न असून, रफाह शहरासह सर्व भाग रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावाची या माध्यमातून अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

इजिप्त सीमेवरही ताबागेल्या मे महिन्यात इस्रायलने असेच आक्रमक अभियान राबवून इजिप्त सीमेसह रफाह क्रॉसिंगवर ताबा मिळवला होता. गाझात प्रवेश करण्याच्या दृष्टीने इतर कोणत्याही देशांसाठी हे एक प्रवेशद्वार आहे. जानेवारीत हमासशी केलेल्या युद्धबंदी करारानुसार इस्रायलने या भागातून आपले सैनिक काढून घेणे अपेक्षित होते. परंतु, याच भागातून शस्त्रास्त्रांची तस्करी होत असल्याचा आरोप करीत इस्रायली सैन्य या भागात तळ ठोकून राहिले. 

पॅलेस्टिनी जाणार कुठे?इस्रायलने या पॅलेस्टिनी नागरिकांना मुवासीच्या दिशेने जाण्याचे आदेश दिले असून, हा एक तात्पुरत्या तंबूंचा निवासी परिसर आहे. नेमक्या ईदच्या पार्श्वभूमीवर इस्रायली लष्कराने हे आदेश दिले आहेत.

५९ ओलिसांचा प्रश्नइस्रायलने हमासच्या ताब्यातील आपल्या ५९ ओलिसांच्या सुटकेसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. या ओलिसांपैकी २४ जण जिवंत असल्याचा अंदाज असून, कोणत्याही परिस्थितीत हमासने शस्त्रे टाकून रफाहसह इतर भूभाग सोडावा, असे इस्रायलने बजावले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी युद्धानंतर गाझातील सुरक्षेची जबाबदारी इस्रायल घेईल तसेच या भागातील लोकांना इतर देशांत वास्तव्याची व्यवस्था करेल, असे म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावाची या माध्यमातून अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्ध