शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Israel war: दोन कारणं, ज्यामुळे अमेरिका इस्राइलला डोळे झाकून देते पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 11:00 IST

Israel war: हमाससोबत संघर्षाला तोंड फुटल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेने या प्रसंगात इस्राइलला पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा केली. दरम्यान, विषय कुठलाही असला तरी अमेरिका इस्राइलला साथ देते. याची दोन प्रमुख कारणं आहेत. ती पुढीलप्रमाणे.

शनिवारी सकाळी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. एवढंच नाही तर सुमारे पाच हजार रॉकेटच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला. हमासच्या या हल्ल्यानंतर इस्राइलकडून गाझापट्टीवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या संघर्षात आतापर्यंत एक हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्राइली नागरिकांसह काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, या संघर्षाला तोंड फुटल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेने या प्रसंगात इस्राइलला पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा केली. इस्राइल गंभीर संकटाचा सामना करत आहे. या परिस्थितीत अमेरिका त्याला पूर्ण साथ देईल, असे अमेरिकेने ठामपणे सांगितले आहे. दरम्यान, विषय कुठलाही असला तरी अमेरिका इस्राइलला साथ देते. याची दोन प्रमुख कारणं आहेत. ती पुढीलप्रमाणे.

इस्राइलसोबत अमेरिका असण्यातलं पहिलं कारण म्हणजे मध्य-पूर्वेतील राजकीय परिस्थिती. येथील राजकीय स्थितीमुळे इस्राइलला साथ देणं अमेरिकेला भाग आहे. पॅलेस्टाइनला इस्लामिक देश ज्याप्रमाणे पाठिंबा देतात. ते अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी चांगलं मानलं जात नाही. अमेरिकेचा मध्य पूर्वेत दबदबा राखायचा असेल, तर कट्टर इस्लामिक विचारांना विरोध करणाऱ्या एका देशाची आवश्यकता आहे, असं अमेरिकन रणनीतिकारांचं मत आहे. इस्राइल हा इस्लामिक कट्टरतावादाविरोधात उभा राहणारा देश असल्याने अमेरिकेचा नेहमी त्याला पाठिंबा मिळतो.

त्याशिवाय अमेरिकन अर्थव्यवस्थेवर ज्यू लॉबीचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे अमेरिकेत कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी जेव्हा इस्राइलचा प्रश्न येतो तेव्हा तेथील सरकारला इस्राइलच्या बाजूने उभं राहावं लागतं.  त्यामुळेच जेव्हा कधी इस्राइलची सुरक्षा किंवा इतर प्रश्न निर्माण होतो तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिक किंवा डेमोक्रॅटिक कुठल्याही पक्षाचा नेता असला तरी तेथे इस्राइलला पाठिंब्याचा निर्णय घेतला जातो.  

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षUnited Statesअमेरिका